
ओंजळ माझी रिती रिती
ओंजळ माझी रिती रिती
गाऊ रे मी गाणी कशी
तुटलीत सारी नातीगोती
सगेसोयरे म्हणू कशी
ओंजळ माझी रिती रिती…
उगा लाविली माया मी
माणसे ना पारखली
स्वाभिमान गहाण ठेवले मी
तरीही सारेच निसटली
ओंजळ माझी रिती रिती…
भावनांचा खेळ मांडला
मन रक्त बंबाळ जाहला
विश्वासाचा धागा तुटला
गाठ बांधायला ही ना उरला
ओंजळ माझी रिती रिती….
सोपविले मी तुझ्यावरी
जगायचे आता वेड्यापरी
कुणीही बोलती काहीही तरी
पंख पसरावे नभावरी
ओंजळ माझी रीती रीती…
गाऊ रे मी गाणी कशी
तुटलीत सारी नातीगोती
सगे सोयरे म्हणू कशी
ओंजळ माझी रीती रीती ….
ज्योती सुधीर कार्लेवार,जि.चंद्रपूर
========