
नागपूरकर अनुभवताय अजूनही उन्हाचा तडाखा
_पावसाच्या प्रतिक्षेत शेतकरी हवालदील_
नागपूर: केरळात उशिरा मान्सून दाखल झाला असून राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात आज ३८ अंशावर तापमान आले असून नागपूरकरांना अजूनही दिलासा मिळालेला नसल्याचे संपूर्ण विदर्भात हे चित्र आहे.
विदर्भातील भंडारा, गोंदिया, अमरावती, वर्धा, चंद्रपूर येथेही सारखीच परिस्थिती असून काल स्काय या हवामान खात्याशी संबंधित असलेल्या संस्थेने पुढील चार आठवडे तरी मान्सून राज्यात दाखल होणार नसल्याचे स्पष्ट केले असून, सध्या मुंबईकरही उकाड्याने हैराण असल्याचे चित्र आहे.
‘बिपरजॉय’ या चक्रीवादळाने भारतात थैमान घातले असून आज दिनांक रोजी बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने वळले असून 160 किमी प्रति वेगाने तिथे थैमान घालत असल्याचे आपण सर्वत्र बघतो आहे.
उपराजधानीकर असलेल्या नागपूरकरांची दिनचर्या ही सूर्याच्या प्रखरतेने सुरू होत असून संध्याकाळी चाकरमानी परत असताना सुद्धा त्यांना उकाळ्याने हैराण होतच आपल्या घरी परतावे लागत असल्याचे चित्र संपूर्ण नागपूरकर अनुभवात आहेत.
स्काय संस्थेने दिलेल्या अहवालानुसार यंदा राज्यात मान्सून उशिरा दाखल होणार असून नागपूरकरांना किमान चार आठवडे तरी पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र या विभागात येत्या दोन दिवसात शाळेची घंटा वाजणार असून तिथे पावसाळा सदृश्य परिस्थिती असल्यासच तेथील शाळा नियमित सुरू असतील. परंतु विदर्भात दिनांक 26 जून नंतर शाळेची घंटा वाजणार असल्याने इथल्या तसेच विदर्भातील विद्यार्थ्यांना थोडा का होईना दिलासा मिळणार आहे. परंतु पुढील चार आठवडे मान्सून हा राज्यात उशिरा दाखल होत असल्यामुळे नागपूरकरांना तसेच विदर्भवासियांना या उन्हाचा त्रास सहन करावा लागणार आहे. त्याप्रमाणे बळीराजा सुद्धा पावसाच्या प्रतीक्षेत असून त्यांच्या पेरण्या रखडल्याचे संपूर्ण चित्र विदर्भात आहे. शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत हवालदिल झाला आहे.