‘सत्तेचा भता’ पचवणारे राजकारणी साधी डकारही देत नाही’; सविता पाटील ठाकरे

‘सत्तेचा भता’ पचवणारे राजकारणी साधी डकारही देत नाही’; सविता पाटील ठाकरेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे काव्य परीक्षण_

मराठवाडा विभागाची राजधानी व ऐतिहासिक शहर औरंगाबाद जिल्ह्यातील सेलू या गावात सरपंच पदाच्या निवडणुकीत लोकशाही गुंडाळून जरा वेगळाच प्रयोग केला गेला व लिलाव करून 14 लाख 50 हजार रुपयात सरपंच पद विकलं गेलं, तर उपसरपंच व सदस्य याही पदांसाठी लिलाव करून 28 लाख 50 हजार रुपये गोळ्या केल्याचे वाचनात आले हे एकच नाही तर अशी उदाहरणे संपूर्ण देशात अधून मधून वाचायला, ऐकायला मिळतात.

एका बाजूला नुकताच आपण ‘भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा केलाय आणि दुसऱ्या बाजूला 75 वर्षानंतर अजून लोकांना लोकशाही कळू नये का?? एवढा विरोधाभास कसं बरं असू शकतो?? खूप वेळ विचार केला. पण उत्तरच मिळेना, जरा भूतकाळात स्वतःला नेले, हे मीही मान्य करते की, मराठी माणसाला दोन गोष्टींमध्ये भारी रस… एक क्रिकेट आणि दुसरं राजकारण, क्रिकेटला जरा बाजूला ठेवते. राजकारणात स्वतःची तहानभूक, घरदार विसरून वेळप्रसंगी स्वखर्चाने झेंडे घेऊन फिरणं हा त्याचा स्थायीभाव. त्यात त्याला काय मिळतं हा पुन्हा संशोधनाचा विषय आहे.

आजकाल राजकारणाचा दर्जा खूप खराब आहे असं का होतं? हे शोधण्यासाठी मी स्वतःला अजून मागे नेलं. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांचा कालखंड वाचला. राज्य, देश पातळीवर काम करताना त्यांनी कधीच वैयक्तिक राजकारण केलं नाही. महाराष्ट्राच्या कृषी, सिंचन, सामाजिक न्याय, विज्ञान तंत्रज्ञानाला नवा आयाम दिला.तर देशपातळीवर नेहमीच स्वाभिमानी राजकारणाची बीजं रोवली. मी कुठल्याही एका पक्षाची बाजू घेणारी नाही मूळतः राजकारण मला आवडतच नाह. ना देशाचं, ना समाजाचे, ना गावातलं, ना मैत्रिणींमधलं. पण एक मात्र नक्की हल्ली ‘सत्तेचा भत्ता’ झालाय. पूर्ण भेसळ झालीय, राजकारणाची एक तर राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालंय, अहो दोन दोन प्रधानमंत्री गमावलेत आपण या निकृष्ट राजकारणापायी. राजकीय पक्ष विचार धारेवर असतात असे नागरिक शास्त्र शिकवते. मग निवडतात एका विचारधारेवर आणि कोणती जादूची कांडी फिरते एका रात्रीत की विचारधारा बदलत पक्षांतर करतात नवी नोट बांधतात. कसं बरं लोकशाही टिकेल ??

यशवंतरावांनी स्वतःचा राजकीय वारस सुद्धा कुटुंबातून ठेवला नाही. तीच गोष्ट सध्याच्या मंत्री नितीन गडकरीजी यांच्याबाबत तेही जाहीरपणे सांगतात. माझा राजकीय वारसदार माझ्या कुटुंबातून नसेल पण बाकीच्यांचं काय?? समजा उपजत नेतृत्व कौशल्य आहे; तर गोष्ट वेगळी. पण वारसा टिकवायचा म्हणून उभे केलेली बुजगावणं कुठे देश हित साधणार आहेत. राजकारणात सत्ता येते, जाते. पण ‘सत्तेचा भत्ता’ खाण्यासाठी पक्षांतर, पक्ष फोडणे, गैरमार्गाचा वापर, न्यायतंत्राचा गैरवापर हे सर्व लोकशाहीला खड्ड्यात टाकणारे आहे. याकडे दुर्लक्ष करून चालण्यासारखं नाही. ‘सत्तेचा भता’ पचवणारे राजकारणी साधी डकारही देत नाही. हल्ली तर ‘ईडी’ची भीती दाखवून काही राजकीय महत्त्वकांक्षाही साध्य केल्या गेल्याचे पहावयास मिळाले. राजकारणाच्या तालावर नोकरशाही नाचली, ही गोष्ट लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असते यावर आपल्याला विचार मंथन करण्याची आज गरज आहे.

मागील दोन दिवसापासून राज्यात ‘शिंदे फडणवीस’ सरकारची जाहिरातबाजी सुरू असून ऐकमेकांवर वार करणे सुरु आहे. पण या जाहिरातीसाठी लागलेला कोट्यवधीचा खर्च हा जनतेचाच पैसा आहे. यावर ना सत्ताधारी, ना विरोधक अक्षरही बोलायला तयार नाहीत. असेच राजकीय विचार मंथन करण्यास भाग पाडले ते ‘मराठीचे शिलेदार’ समुहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी. बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेसाठी ‘सत्तेचा भत्ता’ हा विषय दिला आणि तमाम मराठी सारस्वतांना सांस्कृतिक,सामाजिक क्षेत्राच्या पलीकडे जाऊन राजकीय क्षेत्रात लिहिण्याची संधी उपलब्ध करून दिली.

उपलब्ध संधीचं सोनं करणार नाहीत तर ते शिलेदार कसले? सर्वच कवी कवयित्रींनी विषयाचा अनेक अंगानी विचार करत त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला व सत्तेचा भत्ता कसा असतो हे आपल्या शब्द सामर्थ्याने पटवून दिले. तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन व पुढील लिखाणास अनंत कोटी शुभेच्छा.

*पण थोडं काही….*

कविता म्हणजे आपल्या अंतकरणातील भावनांना आपल्याच शब्द सामर्थ्याद्वारे नटवणे, सजवणे होय. तेव्हा उत्कृष्ट शब्दसामर्थ्य नेहमी तुमच्या कवितेची खोली वाढवते त्यासाठी आपले ज्ञानभंडार अधिकाधिक वाचनाने समृद्ध करूया व मराठी भाषेच्या सक्षमीकरणाच्या यज्ञात आपणही आपली आहुती देवूयात.

सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा
मुख्य परीक्षक, प्रशासक, कवयित्री, लेखिका
©मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles