हिंदूचा प्रभाव वाढण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे’; डाॅ.मधुसूदन घाणेकर

‘हिंदूचा प्रभाव वाढण्यासाठी
सर्वांनी कटिबद्ध व्हावे’; डाॅ.मधुसूदन घाणेकरपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वसुधा नाईक ,पुणे प्रतिनिधी

पुणे: “हिंदू धर्माच्या विचारप्रणालीचा
सा-या विश्वावर प्रभाव वाढवण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे.श्री दगडुशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे हिंदू साम्राज्य दिनाच्या 350 व्या
समारोहा निमित्त छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, याप्रसंगी डाॅ.मधुसूदन घाणेकर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

हिंदुंवर, हिंदू धार्मिक स्थळांवर अजुनही अपप्रवृत्तींचे आक्रमण चालूच आहे. हे थोपवण्यासाठी प्रत्येक हिंदूने
छत्रपती शिवरायांचा आदर्श
आचरणात आणावा. शिवराय
हिंदू धर्म संरक्षक होते.शिवरायांच्या काळात धर्मद्रोही अपप्रवृत्तींनी हिंदूंची
मंदिरे उध्वस्त केली, मात्र
छत्रपती शिवरायांनी ती मंदिरे पुन्हा बांधली. सध्याच्या काळात लव्ह जिहाद सारख्या राष्ट्रविघातक प्रकार
वाढत आहेत.यासाठी हिंदू.संघटन अधिक सक्षम..प्रभावी करण्याची गरज आहे.” असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय विचारवंत आणि पहिल्या विश्व साहित्य
संमेलनाचे अध्यक्ष तसेच विश्वविख्यात हस्ताक्षर मनोविश्लेषण तज्ञ डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले.

शिवरायांचा आठवावा प्रताप ही प्रेरणादायी भावना
प्रत्येक हिंदू धर्मियाच्या ह्रदयात कोरली गेली आहे, शिवरायांची प्रजेच्या सुरक्षेविषयी असलेली सक्रिय तळमळ, साहसी पराक्रमी क्षमता शिवरायांच्या हस्ताक्षरातील दिसते या संदर्भातही डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी प्रकाशझोत टाकला.

या कार्यक्रमाचे संयोजन दत्त मंदिराचे विश्वस्त राजेंद्र बलकवडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रमोद वसगडेकर, रवि सरनाईक, संदीप देशपांडे आदि कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले.याप्रसंगी संतोष फडतरे, अमित गोखले, युवराज पवार आदि मान्यवर उपस्थित होते. राजेंद्र बलकवडे यांच्या शुभ हस्ते अतिथींचा आणि कार्यकर्त्यांचा जाहिर सन्मान करण्यात आला.अनेक शिवराय भक्तांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles