
रानमेवा
झाडाच संरक्षण संवर्धन
काळाची गरज आहे
उत्तम आरोग्यासाठी
झाडांची गरज आहे।
झाडं लावू झाडं जगवू
निसर्ग आपण फुलवू
रानातला रानमेवा
पाखरांना देऊ।
चिंचा,बोर,जांभूळ
आहेत अम्रुतुल्य फळे
आवडीने खातांना बघा
आनंद किती मिळे।
टेंभर,मोहफुले, येरोन्या
रानमेवा तऱ्हेतऱ्हेचा
वनात जाऊन माणव
आणून विकायचा।
आहे पाखरांच ते अन्न
माणवाचही उदरभरन
नका तोडू हो झाडांना
देईल तुम्हा व्रुक्ष नवजीवन।
प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर
======