
सहकार आघाडीचा दणदणीत विजय
नागपूर: रिज रोड हौसिन्ग मेंटेनंस गाळेधारक सहकारी संस्था विश्वकर्मानगर नागपूर
या संस्थेच्या संचालक मंडळ निवडणुक 2023 ते 2028 या कालावधी करिता सहकार विभाग नागपुर तर्फे निवडणूक निर्णय अधिकारी श्री यू.डी.पाटील यांचे उपस्स्थीत दि.18 जून 2023 ला निवडणूक मतदान व मतमोजणी प्रक्रिया पार पडली.
सदर निवडणूकीत सहकार आघाडीचे संयोजक श्री. भीमराव गाणार यांचे मार्गदर्शनात संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मोरेश्वर भादे यांचे नेतृत्वात 11 संचालक छत्री या चिन्हावर सर्वाधीक मताधिक्याने निवडून आलेत. विजयी उमेदवार सर्वसाधारण गट सर्वश्री बाबाराव झटाळे, देवीदास दळवेकर, संदीप फडतरे, संजय वाटपाडे, श्रीमती लीला धिमोले,सुधीर मते, महिला राखीव श्रीमती गंगा कांबळे, श्रीमती लिली फ्रांसिस अनू.जाती राखीव श्री अशोक विजयकर माजी अध्यक्ष लीड़कॉम महा .शासन तसेच ओबिसी राखीव मोरेश्वर भादे वि.जा. राखीव राजेश साव अविरोध निवडुन आलेत.
सर्व विजयी उमेदवारांचे विजयी सभेत राष्ट्रीय ओबिसी आयोग भारत सरकार माजी सदस्य मा. दीपकजी काटोले नागपुर शहर कॉंग्रेस ओबिसी विभाग अध्यक्ष राजेश कुम्भल्कर यांचे ह्स्ते सत्कार करण्यात आले यावेळि कॉंग्रेस चे कार्यकर्ते भाऊरावजी कोकणे, माधवराव गावंडे, मच्छींद्र साळवे, प्रशांत पवार, भुषण तल्हार , व 42 एम. आय.जी कॉलोनीतील नागरिक उपस्थित होते.