राजकारणात जसा फड, तसा तमाशा निवडणुकानिहाय बदलताहेत राजकीय समिकरणे; पालिका निवडणुकांची उत्सुकता

राजकारणात जसा फड, तसा तमाशा
निवडणुकानिहाय बदलताहेत राजकीय समिकरणे; पालिका निवडणुकांची उत्सुकतापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

भंडारा – जिल्ह्यातील पाच पैकी चार बाजार समित्यांच्या निवडणुकीत राजकीय पक्षांसह नेत्यांचे रंगरुप वेगळेच पहायला मिळाले. राज्यात भाजप, शिवसेना युती तसेच राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसची महाविकास आघाडी एकत्रित सक्रिय असतानाच बाजार समित्यांमध्ये मात्र सोयीचे राजकारण खेळले गेले. आता नगरपरिषदांच्या निवडणुका केव्हाही लागू शकतात. शिवाय, विधानसभेच्या निवडणुकीही पुढील वर्षी होणार आहेत. मात्र, या समित्यांतील समिकरणे त्यावेळी लागूच पडतील, असे नाही. या राजकीय समिकरणांवरुन राजकारणात जसा फड, तसा तमाशा असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले.

जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकींमुळे राजकीय धुरळा उडाला होता. तुमसर समिती वगळता भंडारा, लाखनी, लाखांदूर व पवनी या चार बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्या. या चारही बाजार समित्यांच्या निवडणुका मध्ये भाजप – राष्ट्रवादी – शिवसेना (शिंदे गट ) विरुध्द काँग्रेस – शिवसेना ( ठाकरे गट) अशा लढती झाल्या. यात लाखांदूर व पवनी मध्ये आ. नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस – शिवसेना ( ठाकरे गट) ने, तर लाखनी व भंडारा मध्ये माजी आ. परिणय फुके आणि बिडिसीसीचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप – राष्ट्रवादी – शिवसेना (शिंदे गट ) ने सत्ता हस्तगत केली.

मात्र, भंडारा येथे बाजार समितीवर तब्बलसत्ता असलेल्या काँग्रेसच्या रामलाल चौधरी यांचा माजी राज्यमंत्री परिणय फुके , जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांच्या गटाने सभापती पदाच्या निवडणुकीत पुरती धुळधाण उडवली. यातून माजी राज्यमंत्री फुकेनी मागील विधानसभेत पटोले कडून झालेल्या पराभवाचे उट्टे काढत पुढील विधानसभेच्या निवडणुकीची रंगीत तालिमच खेळली.

जिल्ह्यातील चारही बाजार समितीत मात्र राज्यात कोणाचीही युती, आघाडी असली तरीही स्थानिक पातळीवरील समिकरणे वेगळीच असतात, हे पहायला मिळाले. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसची महाविकास आघाडी कार्यरत असतानाही बाजार समितीत भाजपचे नेते डॉ.परिणय फुके यांनी राष्ट्रवादीचे सुनिल फुंडे यांच्याशी युती करत काँग्रेसचे नेते, आ. नाना पटोले यांच्या विरोधात लढा दिला. यात फुके- फुंडे गटाने पटोले यांच्या बरोबरीने सत्ता राखली. आगामी काळात जिल्ह्यातील भंडारा, पवनी, साकोली व तुनसर नगरपरिषदेचीही निवडणूक लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीवरुन फुके- फुंडे परिषदेत एकत्र येणार की काय? विधानसभेसाठी एकमेकांना मदत करणार का? असे कयास राजकीय वर्तुळात बांधले जात आहेत. मात्र, पक्षीय, स्थानिक पातळीवर तशी समिकरण पुढेही राहतील असे तुर्त तरी सांगता येणार नाही.

राष्ट्रवादी, काँग्रेस हे दोघेही मविआमध्ये असतानाही बाजार समित्यांत विरोधात उभे ठाकले. तीच परिस्थिती जिल्ह्यातील चार नगरपरिषदेच्या निवडणुकीत दिसणार आहे. मात्र, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत हे चित्र वेगळेही दिसू शकते. अजून पुलाखालून बरेच पाणी जाणार असल्याची कबुली स्वतः नेतेच देत आहेत. लाखनी बाजार समितीमध्ये तर भाजपचे माजी आ. परिणय फुके , राष्ट्रवादीचे सुनिल फुंडे यांच्या गटाने एकत्रित येवून सत्ता मिळविली. त्यांच्या विरोधात काँग्रेचा गट होता.

भंडारा समितीत सभापती पदासाठी योग्य डाव साधत समझोता एक्सप्रेस करुन काँग्रेसला पराभवाची धुळ चारली. सध्याचे चित्र असे असले तरीही तेच विधानसभेपर्यंत टिकवण्यासाठी नेत्यांना कसरत करावी लागणार आहे.
राजकारणात त्या त्या निवडणुकांचे संदर्भ वेगवेगळे असतात. राजकीय लोकप्रतिनिधीही तेच सातत्याने स्पष्ट करत असतात. पालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुका लागण्यास अजूनही बराच काळ लोटू शकते. या दरम्यान राजकारणातही अनेक बदल घडू शकत असल्याने या निवडणुकांवरुन सध्यातरी पुढील निवडणुकांचे अंदाज बांधता येणार नाही, अशीच चिन्हे आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles