विद्येच्या माहेरघरी, फुले वाड्यातील ‘ती’ अविस्मरणीय भेट

विद्येच्या माहेरघरी, फुले वाड्यातील ‘ती’ अविस्मरणीय भेटपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सविता पाटील ठाकरे,कार्यकारी संपादक

भारतीय शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणणा-या फुले दाम्पंत्याचे अगणित असे महत्व भारतीय नागरिक विसरणे शक्य नाही. तसेच महिलांना शिक्षणाची दारे खुले करून देणा-या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे महिलांसाठी शिक्षण क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी आहे. माझ्याही घरी कन्यारत्न असल्याने त्यांच्या महाविद्यालयीन पुढील शिक्षणासाठी, माझ्या लेकी साक्षी आणि शिवानी यांच्यासोबत ऍडमिशनच्या कामानिमित्त दोन दिवस पुणे येथे वास्तव्यास होतो. थोडा निवांत असल्याने मी माझ्या लेकींना आपण महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या वाड्याला भेट द्यावी असं त्यांना सुचविले असता त्यांनी लगेच होकार दिला.

पुण्यातील काही एक दोन सुशिक्षित स्त्रियांना जवळच असलेल्या फुले वाड्याबद्दल विचारलं असता, दुर्दैवानं त्यांना फुले वाडा माहिती नव्हतं. परंतु रिक्षावाल्यांनी व्यवस्थित नेऊन पोचवले. फुले वाड्यात प्रवेश करताना आमचे मन भरून आले होते. शासनाच्या सहकार्यामुळे वाडा नीटनेटका सुस्थितीत असल्याने मनाला समाधान वाटले. देशातील स्फूर्ती स्थळांपैकी हे एक अत्यंत महत्त्वाचे स्थळ. आम्ही सर्व कौतुकाने वाड्याचे निरीक्षण करत होतो. तिथे लिहिलेल्या बाबी आवर्जून वाचत होतो. हे सर्व पाहताना अंगावर अत्यंत शहारे येत होते. महात्मा ज्योतिबा फुले आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या समाधी स्थळी नतमस्तक होताना मन अभिमानाने ऊर भरून आला.

युगायुगापासून स्त्रियांना हीन दर्जाची वागणूक दिल्या जात होती. स्त्री म्हणजे नरकाचे द्वार, पायाची वाहन पायी बरी, चुल व मुलापर्यंत मर्यादित तिचं जगणं. कुठल्याही बाबबीत तिला साधं मतही व्यक्त करण्याचा अधिकार नव्हता. सती परंपरा, विधवा, केशवपन , स्त्री पुनर्विवाह बंदी यामुळे स्त्रीयांच्या पदरी मरण यातनेच जगणं आलं. त्यांना न्याय मागण्याचा कुठलाही अधिकार नव्हता. मानसन्मान स्वतंत्र अजिबात नव्हतं. अशा वेळेस स्त्रियांच्या उद्धारासाठी कुठल्या देवदेवतांनी अवतार घेतला नाही.

अशा या कर्मकांड व धर्मांध असलेल्या लोकांपुढे आले ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. स्त्रियांना या जाचातून मुक्त करायचं असेल; तर त्यांना शिक्षण द्यावे लागेल स्वतःच्या पायावर उभं करावं लागेल. शिक्षणाशिवाय स्त्रियांचा उद्धार नाही आणि शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही.’ शिक्षणाने स्त्रियांना त्यांचा जगण्याचा अधिकार, स्वातंत्र, मानसन्मान न्याय ,प्रतिष्ट हे सगळे मिळेल. हा क्रांतिकारक विचार महात्मा ज्योतिबा फुलेंनी मांडला. याबाबत दृढ निश्चय केला व सावित्रीबाई फुलेंना स्वतः शिक्षण दिले आणि त्यांना या देशाची पहिली शिक्षिका होण्याचा बहुमान दिला.

त्या काळी स्त्रियांनी शिक्षण घेणे म्हणजे, धर्म बुडविणे असा समज धर्माच्या ठेकेदारांनी जनमानसात रुजवला. त्यामुळे या उभयतांना अशा कर्मठ लोकांच्या रागाला सामोरे जावे लागले. सावित्री माय जेव्हा स्त्री शिक्षणासाठी जाताना त्यांच्यावर कर्मठांनी दगड ,धोंडे ,शेनाचा वर्षाव केला. संपूर्ण कपडे भरले, अंगाला इजा झाल्या, डोके फुटले रक्तस्त्राव झाला तरी सावित्रीमाय आपल्यात ध्येयापासून थोडी विचलित झाल्या नाहीत. त्यांच्या मनोधैर्यावर कसलाही परिणाम झाला नाहीत, उल त्या या आलेल्या संकटांचा सामना करत असताना अधिक कणकर झाल्या व हे महान कार्य अधिक जमाने पुढे नेले. सावित्रीबाईंनी त्यावेळेस सोसलेल्या कष्टामुळे आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री ,मुख्यमंत्री, आयएएस ,आयपीएस अधिकारी , आमदार ,खासदार, महापौर ,जिल्हा परिषद अध्यक्ष ते गावच्या सरपंच पर्यंत महिला होऊ शकल्या. हे सत्य नाकारता येत नाही.

आज सर्वच क्षेत्रात स्त्रिया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपलं कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. स्त्रियांना शिक्षण , स्वातंत्र्य, न्याय, अधिकार, प्रतिष्ठा हे सर्व प्राप्त झालं ते या फुले वाड्यामध्ये. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा पुणे येथील हा वाडा युगायुगा पर्यंत स्त्रियांच्या परिवर्तनाचा जाज्वल इतिहासाची साक्ष व प्रेरणा देत राहणार. आपणही या ठिकाणी येऊन महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या समोर कृतज्ञेने नतमस्तक होताना हृदयामध्ये एका क्रांतीचा अंश घेऊन जावे. असे या भेटीच्या निमित्ताने सर्वांना मनापासून आवाहान आमच्या कुटुंबातर्फे आवाहन आहे.

नरेश शेळके
अध्यक्ष शिवराज शिक्षण संस्था
बुलढाणा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles