संवेदना सोशल फाऊंडेशनने केला नवनिर्वाचित संचालकाचा सत्कार!

संवेदना सोशल फाऊंडेशनने केला नवनिर्वाचित संचालकाचा सत्कार!



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_अपूर्ण शेअर असलेल्या शेतकर्‍यांचे शेअर पूर्ण करण्याची केली मागणी_

श्रीरामपूर :येथील स्वामी विवेकानंद काॅलनीतील रहिवासी दिलीप पाटील कान्हेकर हे बाबासाहेब नाईक सह.सुतगिरणीच्या संचालकपदी चवथ्यांदा निवड झाल्याबद्दल संवेदना सोशल फाऊंडेशनतर्फे त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.

एकमेव सहकारी तत्वावर सुरु असलेल्या पिंपळगांव कान्हा येथील बाबासाहेब नाईक सह.सुतगिरणीची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यामध्ये माजी आमदार मनोहरराव नाईक यांच्या पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले व विरोधकांचे डिपाॅझिट जप्त झाल्याने नाईकांचे सहकार क्षेत्रावर मजबुत पकड असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

दिलीप पाटील कान्हेकर यांनी या निवडणूकीत तिसर्‍या क्रमांकाची भरघोस मते घेऊन विजय संपादन करीत ते चवथ्यांदा संचालकपदी विराजमान झाल्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संवेदना सोशल फाऊंडेशनच्या पदाधिकार्‍यांसह सदस्यांनी बुके व मिठाई देऊन त्यांचा सत्कार केला.यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण देशमुख सवनेकर ,सचिव शशिकांत जामगडे,सदस्य हरगोविंद कदम,प्रताप पतंगे,विजय कदम आदी उपस्थित होते.

यावेळी शेतकर्‍यांचे प्रतिनिधी म्हणून हरगोविंद कदम यांनी बाबासाहेब नाईक सह.सुतगिरणीतील अपूर्ण शेअर असलेल्या शेतकर्‍यांचे शेअर पूर्ण करण्याची मागणी करुन गिरणीला गतवैभव प्राप्त करुन सभासद शेतकर्‍यांना कापूस पिक लागवडीस प्रोत्साहन देऊन संस्थेतर्फे कापूस खरेदी करण्याची विनंती करुन शुभेच्छा दिल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles