
आंबादास दानवे यांनी शोधले खासदार हेमंत पाटील यांचे आडनाव आणि गांव
_गौतमी पाटलानंतर आता खासदार हेमंत पाटील यांच्या आडनावावर प्रश्नचिन्ह_
हिंगोली : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापूर्वी गौतमी पाटील यांच्या पाटील आडनावरून मोठं घमासाम सुरू होतं. मराठा संघटनाकडून गौतमी पाटील हिच्या पाटील आडनाववर आक्षेप नोंदवला होता. आता कुठे हे वादळ शांत होत असताना आता पाटील नावावरून नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
विधापरिषदचे विरोधी पक्ष नेते आंबादास दानवे यांनी हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांच आडनाव आणि गांव शोधून काढलंय. त्यामुळे पुन्हा एकदा पाटील या नावाची चर्चा होतांना दिसत आहे. हेमंत पाटील यांच आडनाव भांबरे असून ते धुळे जिल्ह्यातील साखरे येथील मूळचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शेवटी हिंगोली लोकसभेत शिवसेनेचा खासदार निवडून येईल असा दावाही त्यांनी केला.
_गैरहजर अधिकाऱ्यांच्या थोबाडाला निवेदन चिपकवा – अंबादास दानवे यांचा कार्यकर्त्यांना सल्ला_
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज जिल्हा दौऱ्यावर होते त्यांनी जिल्ह्यातील शिवसेनिकांशी संवाद साधला संवाद साधला यावेळी ते म्हणाले की, जिल्ह्यातील अधिकाऱ्यावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही, शिवसेनेकांनी शिवसेनेचा हिसका दाखवण्याची वेळ आलेली आहे. ज्या कार्यालयात अधिकारी नसतील त्या कार्यालयात जाऊन खुर्चीला निवेदन चिपकवा नंतर अधिकाऱ्याच्या थोबाडाला ही निवेदन चिपकवा बघा कसे सरळ होतात त्यांना शिवसेनेचा हिसका दाखवलाच पाहिजेत. असा सल्ला दानवे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.