
आबांना अमृतमहोत्सवी शुभेच्छा
निर्मळ भाव मनीं तुमच्या
प्रेमळ स्वभाव रक्तात तुमच्या
रोकठोक जरी तुमची बोली
सागरा इतकी विशाल विचारांची खोली…
गर्व होता स्वकष्टाचा भारी
कुटुंबात निभावित आले जबाबदारी सारी
स्वछंदी वाहतो नेहमी मनाचा झरा
मनाचा मोठेपणा गुण अंगी खरा…
संस्कारांची संपत्ती तुम्ही जमविली
वारसारूपात आम्हास ती मिळाली
स्वावलंबी जगणे तुम्ही शिकविले
लहान ,थोरांना नेहमीच मानात ठेवले…
बंध जरी नव्हते रक्ताचे
वडिलांची माया मिळाली हे भाग्यच माझे
असाच स्नेह कायम असावा
आशीर्वादाचा तुमच्या कधी खंड नसावा…
नातवंडांचे प्रेमळ बाबा
लाड करण्याची अनोखी रीत
मजा,मस्ती करीत जणू
सुट्टीत गाती धमाल गीत..
निरोगी,दीर्घायुष्याच्या शुभेच्छा वर्षाव
वर्षानुवर्षे आम्ही तुम्हावर करावा
75 व्या वाढदिवसाला आम्हा सर्वांना
आशीर्वाद तुमचा मिळावा…
आशीर्वाद तुमचा मिळावा…
संध्या मनोज पाटील, अंकलेश्वर