
रंगमंच जीवनाचा
या जगी जगणारी प्रत्येक व्यक्ती
एक कलाकार आहे
आणि हे जग जणू आहे
रंगमंच जीवनाचा
कुण्याच्या वाट्यास दुःख येते
तर कुणाच्या वाट्याला येते सुख
प्रत्येक परिस्थितीत लागतो
पुरता कस अभिनयाचा
कुणी रडते तर कुणी हसते
कुणी व्यक्त होते तर कुणी असते गप्प
ज्याला त्याला वटवावा लागतो
आपापला भाग नाटकाचा
कुणी उपाशी तर कुणी तुपाशी
कुणास चालावावयास गाडी
तर कुणी चाले पायी
मुकाट्याने निभावून न्यावे लागते
आलेल्या प्रत्येक प्रसंगाला
कुणाला प्राप्त होते दुमजली घर
तर कुणाचा उघड्यावर संसार
आहे त्या परिस्थितीत पार पडतो
प्रत्येक प्रसंग जगण्याचा
रंगमंच जीवनाचा अविरत रंगतो
नाटकाला इथे कधीही खंड न पडतो
पात्रे येतात अन जातात
उमटूनी ठसा आयुष्याचा
डाॅ.नझीर शेख
ता.राहाता,जि अहमदनगर