जागतिक अन्नसुरक्षा दिन..

जागतिक अन्न सुरक्षा दिन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सत्यम शिवम सुंदरम यांचा हृदयंगम संगम म्हणजे आपली भारतीय संस्कृती. या भारतीय संस्कृतीमध्ये भारतासारख्या शेतीप्रधान देशामध्ये ‘अन्न हे परब्रह्म’ आणि अशा या अन्नाची नासाडी. आपल्या घराघरातून नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. घरी केलेला स्वयंपाक नाही आवडला हॉटेलमधून पार्सल मागवणं, घरातल्या एखाद्या खवय्या व्यक्तीच्या मनात आलं की हॉटेल मध्ये जेवायला जाणं, मनात येताना पार्सल आणलं की घरचा स्वयंपाक मग शिळा करून खाणं.. या साध्या साध्या गोष्टीतून अन्न वाया जात. पण या बाबतचा बारकाईने विचार आपण सहसा करीत नाही. आणि केलाच तर तो… आरोग्यास घातक ठरणाराच असतो. जसे की, अन्न वाया जाऊ नये म्हणून उरलेले बळच संपवणं, सकाळचं उरलेलं संध्याकाळी खाणं, फ्रिजमध्ये ठेवून दोन-दोन दिवस तेच अन्न वापरणं.

अर्थात हे ‘आम्ही बायकांचं करतो बर… या बाबतीत पुरुष हुशार म्हणावे लागतील… ते नेहमी सांगत असतात,, शिळं खाऊ नका.. पण आम्ही बिचाऱ्या, हे झालं घरातलं… पण आपण बाहेरही पाहतो… लग्नात वधू-वरांच्या अंगावर अक्षदा टाकण्यातून वाया जाणारा तांदूळ,, हॉटेलमध्ये देखील वेगवेगळ्या ऑर्डरी आपण करतो आणि उरलेले अन्न तसंच टाकून येतो.. लग्नसमारंभात उगीचच उगीच नको नको म्हणत असतानाही ताटात जास्तीचे वाढणं, त्यातून ते उष्ट टाकणं… अशा एक ना अनेक गोष्टी यातून अन्न सहज वाया जातं आणि आपल्याला ते कळतही नाही. नका करू अन्नाची नासाडी कारण गरज आहे ती सर्वांची.म्हणूनच. आणि दूषित आहाराबद्दल जागरुकता आणण्यासाठी, कुपोषणातील बळी थांबवण्यासाठी 7 जून 2019 पासून जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा केला जाऊ लागला.

प्रत्येक व्यक्तीला मिळावे जेवण
म्हणूनच साजरा केला अन्न सुरक्षा दिन

असं मला वाटतं…. किमान त्या निमित्ताने का होईना जनतेच्या लक्षात येईल आणि याला थोडा आळा बसेल… आणि तसे झालेही… गेल्यावर्षी पुण्यामध्ये संजीव नेवे आणि अनिता नेवे यांनी, “फूड दोस्ती ॲप” ची निर्मिती केली की, ज्याच्या माध्यमातून हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांना शिल्लक राहिलेले अन्न शहरातील गरजू व्यक्तींना दान करण्याची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली.
काही ठिकाणी लग्न कार्यालयात भरपूर खा पण उष्टे टाकू नका.. अशा पाट्या जेवणाच्या टेबलवर लावलेल्या दिसल्या..
पण आता पुन्हा पहिले पाढे पंचावन्न असं चित्र दिसू लागलय… म्हणून आजपासून आपण आपल्यातच हा बदल करून घेतला तर नक्कीच फार नाही पण किंचित सुधारणा केल्याचं समाधान आपल्या मनाला मिळेल, असं मला वाटतं

जेवताना शेतकरी राजाचे नक्की आभार माना. कारण भाकरीचं पीठ जरी विकत मिळत असलं तरी ज्वारी ही शेतातच पिकवावी लागते. आज या अन्न सुरक्षा दिनाविषयी थोडंसं जागरूकता अंगी बाळगण्या साठी लिहावं वाटलं.. तुमच्या भेटीला पाठवावं वाटलं….म्हणून हा शब्द प्रपंच….!

अनिता व्यवहारे
ता.श्रीरामपूर जि अहमदनगर
===========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles