
*समाज बंधने*
संविधानाने शिकविले
माणुसकी एकच धर्म
एक एक कलमातून
जाणून घ्या त्याचा मर्म
स्वातंत्र्य,समता बंधुभाव ठेवून
एकोप्याने राहायाचे असते
मंगलयममैत्रीच्या भावनेतून
आपल्याला वागायचे असते
आपण एकाच रक्ताचे ना..?
मग समाज बंधने लादायचे नसते
तो वेगळ्या समाजाचा आहे
म्हणून हिन त्यांना मानायचे नसते
प्रेम विवाह करणे हा काय गुन्हा आहे
समाज बंधने त्याला अडसर येत आहे
कित्येकांचा नाहक येथे
रोजच बळी पडत आहे
समाज बंधने लादून
माणुसकीला काळीमा फासू नका
जगा आणि जगू द्या
हाच मुलमंत्र ध्यानी ठेवा…
जगा आणि जगू द्या
हाच मुलमंत्र ध्यानी ठेवा…
*सुधा अश्वस्थामा मेश्राम*
*अर्जुनी/मोर.गोंदिया*
*सहप्रशासक मराठीचे शिलेदार समुह*