
मराठा विद्या प्रसारक समाजातर्फे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न
नागपूर: ३५० व्या श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त संस्थेच्या सक्करदरा चौकातील कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत डॉ. राजे मुधोजी भोंसले यांचे अध्यक्षतेखाली राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात विजय शरदराव भोसले व ममताताई भोसले यांचे शुभ हस्ते विधिवत संपन्न झाला.
त्यानंतर ४०० वर्षापूर्वी शहाजी महाराज भोसले यांनी स्थापित केलेले गोसायी महासंस्थान मठ भवानी दत्तपीठ येथील जगद्गुरु वेदांताचार्य मंजुनाथ भारती स्वामीजी (कर्नाटक) यांचे समाजाचे वतीने स्वागत व दर्शनाच्या सोहळा संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत मुधोजी राजे भोंसले यांच्या अध्यक्षतेत आयोजित करण्यात आलेला होता.
याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी सर्वश्री प्रशांत (बालू) भोसले विलासराव वाघ, दिलीपराव सस्ते, शिरीष राजेशिर्के, डॉ.प्रकाश मोहिते, प्रविण शिर्के, निलेश चव्हाण, अविनाश घोगले, कृष्णराव गायकवाड, गजाननराव कावळे अनिताताई जाधव, ममताताई भोसले, महेश पवार यांचे सह समाज बाधवांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.