
बौद्ध समाजावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात कठोर पाऊले उचला शासनाला निवेदन
आंबेडकरी विचार व रिपब्लीकन मोर्चातर्फे निवेदन
नागपूर : राज्यात दलित बौद्ध समाजावर अन्याय अत्याचारांनी कळस गाठला आहे नांदेड जिल्ह्यातील बोनडार गावात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून भिम सैनिक अक्षय भालेराव यांची निर्घृण हत्या करून त्यांच्या परिवाराला जखमी करण्यात आले.या घटनेचा निषेधार्थ आंबेडकरी विचार मोर्चा आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा च्या वतीने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसील कार्यालय येथे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले त्यांचाच भाग म्हणून नागपूररात जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की अनुसूचित जाती जमाती च्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, परिवर्तनासाठी बार्टी ची स्थापना करण्यात आली आणि त्यांचे परिणाम पण चांगले आलेत पंरतू सध्या बार्टी चे संचालक यांच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थी वेठिला आले या कार्यालयात आताच जातियवादी मानसिकता ने उन्माद वाढवत आहे याची चौकशी करून गैर कारभार करण्याऱ्या ची हकालपट्टी करण्यात यावी. माता सावित्रीबाई फुले यांच्या विरोधात खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करणारे यांच्या वर कठोर कारवाई करावी, माई रमाई आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक वरली स्मशानभूमी येथे झालेच पाहिजे, नागपूर अंबाझरी उद्यान येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक निर्माण करण्यासाठी पुढाकार घेऊन पाय उभारणी करण्यात यावी इत्यादी मागण्यांचा समावेश होता.
शिष्टमंडळात नारायण बागडे, प्रा.के. एस.पानतावणे, प्रा.रमेश दुपारे, प्रकाश कांबळे, राजू पांजरे, धर्मा बौद्ध, दादाराव पाटील, वैशाली तभाने, प्रतिभा चव्हाण, साहेबराव सिरसाट उपस्थित होते.