बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चारोळ्या

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट दहा🌈🌈🌈*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*💦विषय : आस मृगाची*💦
*🍂बुधवार : ०७ / जून /२०२३*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ८९ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*आस मृगाची*

पेरणी योग्य केली शेती
कडक उन्हात करून मशागत,
आता फक्त,आस मृगाची
ये रें, पावसा,हसतखेळत.

*मायादेवी गायकवाड मानवत, परभणी*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️💦🪷💦♾️♾️♾️♾️
*आस मृगाची*

रनरनता वैशाख वनवा
शेत नागरून तयार झाली
बळीराजास पेरणीसाठी
आस मृगाची लागली

*विजय शिर्के*
बजाजनगर , छ. संभाजी नगर .
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💦🪷💦♾️♾️♾️♾️
*आस मृगाची*

वैशाख वणवा हा दाह सोसेना
चोच कोरडी पिला पाखरांची
आसुसली धरणी माता
येरे घना आस मृगाची.

*सौ विमल धर्माधिकारी वाई सातारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💦🪷💦♾️♾️♾️♾️
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. ३.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नका)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*आस मृगाची*

कोरडी पडली धरणी
भेगा पडल्या काळ्या मातीला
आस मृगाची लागली
मागने मागते पावसाला

*सौ पुष्पा डोनीवार*
बाबुपेठ चंद्रपूर
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️💦🪷💦♾️♾️♾️♾️
*आस मृगाची*

आस मृगाची लागे
माझ्या बळीराजाला
फुलता हे शिवार
आनंद होई मनाला

*विनायक कृष्णराव पाटील बेळगाव*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्य*
♾️♾️♾️♾️💦🪷💦♾️♾️♾️♾️
*आस मृगाची*

*ग्रीष्माच्या तीव्रतेने केली*
*अशी काहिली जीवाची*॥
*कि अधीरपणे !उत्कटतेने*
*लागली मनाला आस मृगाची*॥॥॥॥

*डाॅ. नझीर शेख राहाता*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💦🪷💦♾️♾️♾️♾️
*आस मृगाची*

जमीन उन्हांत रापली
लागली आस मृगाची
मशागत आधीच केली
पाड रिपरिप पावसाची

*श्री नितीन झुंबरलाल खंडागळे*
अंबरनाथ जि. ठाणे
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️💦🪷💦♾️♾️♾️♾️
*आस मृगाची*

धरणी माय आसुसली
सृष्टी हिरवीगार कराया
आस मृगाची लागली
आनंदी शेतकरी पहाया

*सौ.सिंधू बनसोडे.इंदापूर.पुणे*
*©सदस्या.मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💦🪷💦♾️♾️♾️♾️
*आस मृगाची*

आस मृगाची,
कास्तकारासं लागली,
बि- बियाण्याची तडजोड,
जिकडे तिकडे सुरू लागली…

*साक्षी भोयर राळेगाव*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💦🪷💦♾️♾️♾️♾️
*चारोळी–आस मृगाची*

केला ग्रीष्माने कहर
काया धरेची रापली
मेघ दाटता अंबरी
आस मृगाची लागली.

*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles