सेंट रिन्झाई पब्लिक स्कूल दहावीचा निकाल यंदाही १००%, ११ विद्यार्थी प्रथम श्रेणीत

सेंट रिन्झाई पब्लिक स्कूल दहावीचा निकाल यंदाही १००%, ११ विद्यार्थी प्रथम श्रेणीत



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*_उज्ज्वल यशाची परंपरा कायम_*

नागपूर: उत्तर नागपूर शहरातील बिनाकी मंगळवारी, कांजी हाऊस चौक येथील सेंट रिन्झाई पब्लिक स्कूलचा दहावीचा निकाल यंदाही १००% टक्के लागला असून, ११ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असल्याची माहिती रिन्झाई पब्लिक स्कूलचे संचालक व प्राचार्य झेनिथ जवादे यांनी सांगितले.

कांजी हाऊस चौक उत्तर नागपुरातील अती ‘स्लम एरिया” असून या परिसरात गोर गरीब, होतकरू पालक व नागरिक वास्तव्य करतात. रिन्झाई पब्लिक स्कूल मध्ये २०१७ पासून दहावीच्या वर्गास परवानगी प्राप्त झाल्यापासून दरवर्षी १००% निकालाची उज्ज्वल परंपरा यंदाही कायम ठेवलेली आहे. सहशालेय उपक्रमासह अध्यापनातील सातत्य हे शिक्षकांच्या परीश्रमाचे यश असल्याचे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितले.

शाळेत सातत्याने विविध विषयावर सेमीनार, मार्गदर्शन शिबीर व चर्चासत्रे विद्यार्थांच्या दृष्टीने आयोजित करण्यात येत असून त्यांच्या व्यक्तीमत्व विकासावर विशेष भर देण्यात येत असल्याचेही झेनीथ जवादे यांनी सांगितले. फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत सेंट रिन्झाई पब्लिक स्कूलचे ११ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. यामध्ये कु महिमा मोहाडीकर ८९.००%, अन्योक्ती बन्सोड ८८.४०%, रिषीका धकाते ८४,४०%, आयुषी डेकाटे ८४.२०%, सृष्टी तिरपुडे ८३.४०%, सृष्टी चव्हाण ८३.२०% धनश्री बारापात्रे ८३.६०%, प्रनोती रामटेके ८३.००%, श्रीकांत चौरे ८१.२०%, पायल कुमरे ८०.८०%, विपुल हरकंडे ८०.२०% या विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत येण्याचा मान प्राप्त केला असून या मुलांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles