
लोकनायका
आरक्षणाचे पहिले जनक
कोल्हापूर संस्थानाचे राजे
राजर्षी छत्रपती शाहू महाराज
नाव साऱ्या महाराष्ट्रात गाजे
बांधा- पाडा धोरण आखुनी
भटक्यांना रोजगार दिला
दीनदलितांना घरे बांधूनी
जनतेला पक्का आधार दिला
राधानगरी धरण बांधून
घडवून आणली हरितक्रांती
जलधान्याचा प्रश्न मिटवून
प्रजेत नांदविली सुख शांती
पोथी पुराने दूर सारूनी
अधिकार दिला समतेचा
प्रगतीचा मार्ग दाखवून
उद्धार केला जनतेचा
दूर करण्यास जातीयता
कायदा केला आंतरजातीय विवाहाचा
कायमची बंद करून गुन्हेगारी
ठरला आदर्श राजा वंचितांचा
जो पालक आपल्या मुलांना
शाळेत नाही घालणार
त्यांच्याकडून एक रुपया दंड
वसूल केल्या जाणार
प्राथमिक शिक्षण मोफत मिळण्या
कायदा केला सक्तीचा
स्वप्न त्यांचे पूर्ण करण्यासाठी
दिला आधार वस्तीगृहाचा
कला संस्कृती क्रीडा शिक्षण
यांना राजाश्रय देणारा राजा
अंधश्रद्धा आणि कर्म कांडावर
घनाघाती प्रहार करणारा राजा
दृष्टी महान मानवतावादी
अंगी विचार शिवरायांचा
दूर सारुनी जातीयवाद
विकास साधला जनतेचा
आदर्शच तू लोकनायका
सर्वच क्षेत्रात ठसा तुझा
लाख मोलाची कामगिरी केली
यास्तव ,….
आदराने झुकतो माथा माझा
आदराने झुकतो माथा माझा
प्रा. दिनकर झाडे
गडचांदूर, जिल्हा चंद्रपूर.