
मनकवडा
नक्की काय हवे हे खूब जाणतो.
मनकवडा सखा मनाचा ठाव घेतो.!धृ!
कुठे काय अडते त्याला समजते.
हृदयाची धडधड त्याला कळते.
डोळ्याचे भाव स्पष्ट ओळखतो.
मनकवडा सखा मनाचा ठाव घेतो.!1!
मौनाची भाषा त्यालाच कळते.
मुकशब्दाची कैफियत समजते.
अंतर्मनाचा तो कानोसाच घेतो.
मनकवडा सखा मनाचा ठाव
घेतो.!2!
चोर पावलांनी विचार येता.
विचारांना कृतीत उतरवतो
भावलहरींचे तरंग समजतो.
मनकवडा सखा मनाचा ठाव
घेतो.!3!
प्राजक्ता आर खांडेकर
सुगत नगर नागपूर