जिवलग मित्र..पाऊस!!!

जिवलग मित्र… पाऊस!!!पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पाऊस!!!!!….
धो धो बरसणारा, रिपरिप, रिमझिम, त्यांच कुठलंही रूप असो,… मला नेहमीच आकर्षित करतं. मी कुठल्याही मनस्थितीत असू दे, भिजण्याचा मोह मला, आवरता येतं नाही. कुणाचीही पर्वा न करता, मनसोक्त पावसात भिजणं.. हा माझा बालपणीचा छंद.
अंगणात पाणी जमा झाले कि, पाण्यात कागदी होड्या सोडायच्या.. ती हेलकावे घेतं धारेला लागली कि, माझा आनंद गगनाला भिडायचा.

बालपनापासूनच मला, पावसाचं वेडं आणि कुतूहल.. आजवर तसुभरही कमी झालेलं नाही.
जेव्हा तो बरसत असतो.. मी वेड्यागत त्याला कवेत घेते… आभाळ मनाचं माझ्या, त्याच्यापाशीच रीतं करते.. तो ही ऐकून घेतो, गप गुमानं,..मूक संवाद सुरु असतांना, अश्रूना वाट मोकळी मिळते.. कुणाला दिसण्याआधी, अश्रूना तो ही स्वतःत सामावून घेतो. माझ्या सुखं दुःखाच्या अश्रुंचा, फक्त तो एकटाच साक्षीदार असतो.

मला वेडं लावणारा पाऊस,.. सृष्टीच्या चराचराला नवं चैतन्य देणारा पाऊस, वसुंधरेला हिरवाईचा साज शृंगार देणारा पाऊस, कुणाला आवडतं नाही.

पाऊस म्हणजे जीवन, तो कुणात भेद करत नाही. सर्वावर सारखा बरसतो.
त्याला बेधुंद बरसतांना पाहिलं कि, प्रत्येकवेळी मला तो नवा वाटतो… त्याचं ते नवं रूप मला आकर्षित करतं, प्रेमात पाडतं.
निसर्ग सौन्दर्यात भर घालणारे,
चिंब भिजलेल्या पानातून ओघळणारे, थेंबा, थेंबाचे नक्षी…
आणि पाऊस अंगावर झेलत… उंच आभाळात उडणारे चिंब भिजलेले पक्षी. दोघांचही मला फार कुतूहल.

पाऊस माझा जिवलग मित्र…
त्यांच्याएवढं कुणीच समजून घेतलं नाही आजवर.
तो च एक, ज्यांनी…कुठलीही तक्रार न करता, मला माझ्या गुण दोषासह स्वीकारलं.. मला आपलं मानलं.

पावसालाही कळतं, त्यावर माझी अपार माया,
म्हणून तर येतो…अधेमधे… मला भेटायला… कधी वादळ वाऱ्याशी मैत्री करून … तर कधी अवकाळीच रूप घेऊन… आणि जातो मला.. चिंब भिजवून.. आनंद देवून. माझा मित्र, माझा सखा… पाऊस!!!!!.

सौ इंदू मुडे, ब्रम्हपुरी.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles