शाळा प्रवेशोत्सव पर्व न्यू मून स्कूलमध्ये उत्साहात साजरा

शाळा प्रवेशोत्सव पर्व न्यू मून स्कूलमध्ये उत्साहात साजरा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रा तारका रूखमोडे, गोंदिया प्रतिनिधी

गोंदिया: अर्जुनी /मोर :न्यु मून इंग्लिश मिडीयम स्कूल अर्जुनी/ मोर. येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी शंभर टक्के हजेरी लावली. उत्स्फूर्त प्रतिसादात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. शैक्षणिक धोरणाच्या नविन जि.आर. नुसार शालेय सर्व बाबींचे नियोजन करून त्याची पूर्तता करण्यात आली. देशाच्या विकासाची पहिली पायरी म्हणजे शिक्षण. बालकांच्या सुसंस्कारीत व्यक्तिमत्व जडणघडणीत शिक्षणाचा मोठा वाटा असतो.

शाळा प्रवेशासमयी विद्यार्थ्यांना औक्षवण करून स्वागत करण्यात आले,विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी विविध शैक्षणिक साहित्याचा वापर करून जिज्ञासा वाढवणारे ज्ञानरचनावादी खेळ घेण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये मूल्यसंस्कार रुजवण्यासाठी व उत्साह वाढवण्यासाठी शुभेच्छा कार्यक्रमही घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.राकेश उंदिरवाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून सचिव ओमप्रकाशसिंह पवार, राधेश्याम भेंडारकर, प्रा.तारका रुखमोडे व प्राचार्य के. डी. देशमुख मंचावर उपस्थित होते.

याप्रसंगी स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन केले.विद्यार्थी हे शाळेचे आधारस्तंभ आहेत.चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात व जीवनाचे ध्येय ठरवावे,असे ओमप्रकाशसिंह पवार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले. अभ्यासाचा संकल्प करून शाळेचे नावलौकिक करावे असे प्रतिपादन देशमुख यांनी केले.तर प्रा.
उंदिरवाडे यांनी विद्यार्थ्यांना शाळेच्या नियमांबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सुरज मोटघरे, देविदास बांडे, जितेंद्र कटकवार, लिना चचाणे,त्रिवेणी थेर, शीला बोरीकर, कुंजना बडवाईक, हीना लांजेवार, प्रतीक्षा राऊत, यामिनी भंडारी, आरती मुंगूलमारे यांनी सहकार्य केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles