
बेलोरो पिकअप वाहनाच्या धडकेत भिमवाडी येथील तरूण जखमी
_उपचाराकरिता पैसा पडत आहे कमी_
तालुका प्रतिनिधी, पुसद
पुसद: येथील मामा चौकामध्ये वाशिम रोड वरून विश्राम गृहाजवळील पुलावरून दुध वाटप करीत जात असलेल्या तरुणाला बोलेरो पिकप वाहनाने दि.९ जुलै २०२३ रोजीच्या सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान धडक दिली.त्या धडकेमध्ये तरूण जखमी झाली असून बोलोरो पिकप विरोधात वसंत नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सतिष हरीभाऊ दुथडे वय २५ वर्षे रा.भिमवाडी असे जखमीचे नाव आहे. जखमीची बहिण वैशाली सदाशिव इंगोले वय ३० वर्षे रा.भिमवाडी यांनी बोलोरो पिकप वाहन चालका विरोधात तक्रार दिली असता गुन्हे दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार वाशिम रोड वरून दुध वाटप करीत विश्राम जवळील फुलावरून घरी जात होता.अशावेळी बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एमएच २९,बीई ३००६ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून सतिषला धडक दिली.त्या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या.
सोबतच त्या तरुणाचा कान देखील कापला असून त्याच्यावर एका दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहेत याची घरची परिस्थिती नाजूक असून त्याच्यावर उपचार करिता रक्कम कमी पडत असुन आर्थिक मदत करण्याचे आवाहन विविध सोशीयल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.वसंत नगर पोलिसांकडून वाहन चालकाचा शोध घेणे सुरू केले आहे.