माहेर..

माहेरपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

खुलू लागल्या नयनपाकळ्या
रुखरुखणारे क्षण विसावले
आतुरता अन् ओढ भेटीची
हर्षभरित हृदयस्पंदन मोहरले…

भावगर्भित बंध नात्यांचे
गहि-या संवेदनांचा फुलोरा
लेकीच्या पाऊलांसाठी नित
प्रतिक्षेत माहेरचा उंबरा…

अवचित सारे सुख- सोहळे
खळखळणारी हास्य लहर
अनुबंधाच्या रेशीम गाठी
हृदयांतरी पुलकित बहर…

पाठीवरती हात धीराचा
सुख-दु:खात गोतावळा
आयुष्याच्या प्रवासातील
विश्वासाचा श्वास मोकळा…

बंध मायेचे आपुलकीचे
अंतरी आठवांचे मोहोळ
परतीच्या वाटेवर ओलावते
हळव्या पापणीची कड…

नको निराशा दुखावणारी
अन् दूर दूरचे स्थित्यांबर
सुमनांपरी गंध पाझरणारे
मनगाभा-यातील माहेर
हवे मनगाभा-यातील माहेर…

आशा कोवे-गेडाम
वणी जि.यवतमाळ
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles