‘महा एनजीओ’ फेडरेशन द्वारा यवतमाळ जिल्हा आढावा बैठक

‘महा एनजीओ’ फेडरेशन द्वारा यवतमाळ जिल्हा आढावा बैठकपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुसद तालुका प्रतिनिधी

पुसद: यवतमाळ जिल्ह्यातील सामाजिक स्वयंसेवी संस्थांच्या नानाविध समस्या व त्यावरील उपाय योजना या करिता महा एनजीओ फेडरेशन द्वारा आयोजित यवतमाळ जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील ५० पेक्षा अधिक सामाजिक संस्था प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते .

महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्रीशेखरजी मुंदडा यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला . महा एनजीओ फेडरेशनचे कार्यकारी संचालक अक्षयमहाराज भोसले त्यांनी प्रथम टप्प्यात उपस्थितांशी संवाद साधला व समस्यांची निराकरण केले. मुख्यमंत्री आरोग्य कक्ष, शासन आपल्या दारी व नानाविध केंद्र सरकारच्या योजनांची माहिती यावेळी देण्यात आली.

महा एनजीओ फेडरेशनच्या कामाबाबत उपस्थितांनी सविस्तर माहिती घेतली. महा एनजीओ सोबत मागील चार वर्षांपासून सलग्न असणाऱ्या संस्थांनी कामाबाबत समाधान दर्शवले.
शेखर मुंदडा म्हणाले कि, शासन व्यवस्था बघेल अवस्था मात्र आपल्याला पहावी लागेल. भारत देशाच्या विकासामध्ये आपल्या सर्वांचे योगदान महत्त्वाचे. समाजापुढे आदर्श निर्माण करण्याची काम सर्व एनजीओ कडुन व्हावे . महाएनजीओ फेडरेशन त्यात निश्चित आपल्या सोबत खंबीरपणे उभे असेल हा
विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. गो सेवा आयोगाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना होणारा फायदा व कार्यवाही याबाबत देखील मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाची आयोजक संस्था स्व. मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था बेलोरा ता. पुसद जि. यवतमाळ चे अधक्ष राजकुमार भगत , इरफान शेख, जया शेंडे, नरेंद्र सोनटक्के, सतीश वानखेडे, राजू इंगोले व सुदर्शन सूर्यवंशी, तुषार रेडिवार, दिपाली रेडीवार, सुनयना यवतकर, इतर संस्थेचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles