मा.ना.नितीनजी गडकरी यांना संत सेवालाल महाराज यांचे तैलचित्र भेट

मा.ना.नितीनजी गडकरी यांना संत सेवालाल महाराज यांचे तैलचित्र भेटपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुसद तालुका प्रतिनिधी

पुसद: अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या शिष्टमंडळाने भारत सरकारचे सडक, परिवहन व राज्यमार्ग मंत्री, नितीनजी गडकरी यांची रविवारी नागपूर येथील त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांना क्रांतिकारी विचाराचे महापुरुष संत सेवालाल महाराज यांचे तैलचित्र सप्रेम भेट देऊन भटक्या विमुक्त व बंजारा समाजाच्या विविध प्रश्नांवर मनमोकळी चर्चा झाल्याची माहिती अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष संजय मदन आडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
संजय मदन आडे यांनी मागील अधिवेशनात बंजारा समाजाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी गहुली ते नागपूर पायदळ यात्रा काढली होती. या प्रकरणाची पायदळ यात्रेतील प्रमुख मागणी माळपठारावरील सिंचन समस्या ही होती.सदर समस्येवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या वतीने संजय आडे यांनी दिली आहे.
सोबतच भटक्या विमुक्तांचे आरक्षण, क्रिमिलेयर, केंद्रशासनाच्या बजेटमध्ये भटक्या विमुक्तंचा समावेश, वसंतराव नाईक महामंडळ, तांडा सुधार योजनेचा निधी, घरकुल संबंधीचे प्रश्न, वन विभागातील तांडयासाठी अंबुलेंस, दवाखाने, परदेशी शिष्यवृत्ती, भटक्या विमुक्तांच्या विद्यार्थ्यासाठी वसतिगृह, यासह नागपूर शहरातील महानायक वसंतराव नाईक सभागृह अशा विविध प्रश्नांवर याप्रसंगी मा. गडकरी साहेबांनी शिष्टमंडळासोबत चर्चा केल्याची माहिती नामा बंजारा यांनी दिली.
होळीच्या पूर्वसंध्येला उमरेड तालुक्यातील मांडवा गावातील बंजारा स्त्री पुरुषांना पोलीसांकडून झालेली अमानुष मारहाण याप्रकरणी मा. नितीनजी गडकरी यांनी आपल्या स्वीय सहायकांना बोलावून विशेष नोंद करण्याची सूचना केली. असल्याचेही तांडा सुधार समितीचे मिडीयाप्रमुख धर्मेंद्र जाधव यांनी दिली आहे. याप्रसंगी अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉ.विष्णू चव्हाण यांनी वसंतराव नाईक महाविद्यालय नागपूर जवळील मोरिष कॉलेज टी पॉइंट हे फलक हटवून त्याठिकाणी महाविद्यालयाच्या नावावरून वसंतराव नाईक चौक असे नामकरण करण्याची विनंती केली.

शिष्टमंडळामध्ये मांडवा येथील माता भगिनीसह महासचिव नामा बंजारा, मीडिया प्रमुख धर्मेंद्र जाधव, महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉ. विष्णू चव्हाण, ईश्वर जाधव यांचा समावेश होता.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles