
मांजर जवळच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ये जा करण्यासाठी रस्त्याची मागणी
_शाळा परिसरात चिखलाचे साम्राज्य_
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद: तालुक्यातील मांजर जवळा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी रस्त्याची मागणी होत आहे. ग्रामपंचायती जवळ नाली नसल्यामुळे गावातील सांडपाणी त्यात पावसाचे पडणारे पाणी रस्त्यावरून वाहत आहे.यामुळे शाळा परिसरामध्ये चिखलाचे साम्राज्य पसरले असे आहे. विद्यार्थ्यांना ये-जा करताना घसरून पडल्याच्या घटना घडत आहे.त्यामुळे ग्रामपंचायतीने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी पालकाकडून जोर धरत आहे.
पुसद शहरापासून जवळपास ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मांजर जवळा ग्रामपंचायतची लोकसंख्या जवळपास १ हजार ५०० आहे.एवढी लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा आहे. शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्या मोठ्या प्रमाणात आहे.परंतु शाळा परिसरात व रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने शाळेत ये-जा करण्याकरिता विद्यार्थ्यांना चिखलातून कसरत करत मार्ग काढावा लागत आहे.मांजर जवळ येथून बेलोराकडे जाणारा एकमेव मार्ग असल्याने त्यात पावसाळ्यामध्ये चिखलाचे साम्राज्य पसरल्याने ग्रामस्थांची देखील मोठी गैरसोय होत आहे. रात्रीच्या वेळेला अनेक जण घसरून पडल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत.त्यामुळे ग्रामपंचायतीने तात्काळ रस्त्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थासह विद्यार्थ्यांच्या पालकांकडून जोर धरत आहे.
*मुरूम टाकण्यासाठी सांगतो*
शाळेच्या बाजूलाच उल्हास जाधव यांचे शेत असून त्यांनी शेतातील पाणी जाण्यासाठी नाली खोदली होती.त्या नालीचा मुरूम त्यांनी रस्त्याच्या कडेला टाकल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.सध्या रिमझिम पाऊस सुरू असल्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने मुरूम टाकण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी पाणी थांबल्यावर रस्त्यावर मुरूम टाकणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता असून त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांना पत्र देणार आहे.-हेमंत काळे,ग्रामसेवक, मांजर जवळा.
*रस्त्यासाठी प्रस्ताव टाकला*
रस्त्याच्या डाग-डुजीसाठी आमच्या स्तरावर प्रस्ताव टाकलेला आहे.गावातील सिमेंट काँक्रीटचा रस्ता ठीक ठिकाणी फुटलेला आहे.तर त्या डाग-डूजी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रयत्न करणार आहे
विनोद जाधव,सरपंच, मांजर जवळा.