आजचे दिनविशेष; दिनांक: १९ जुलै २०२३: बुधवार

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🔴 आजचे दिनविशेष🔴*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*📘दिनांक: १९ जुलै २०२३: बुधवार📘*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*महत्वाच्या घटना*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

१६९२: अमेरिकेतील सेलम शहरात चेटकीण असल्याच्या आरोपाखाली स्त्रियांना फाशी देण्यात आली.

१८३२: सर चार्ल्स हेस्टिंग्स यांनी ब्रिटिश मेडिकल असोसिएशन आणि सर्जिकल असोसिएशनची स्थापना केली.

१९००: पॅरिस मेट्रोची पहिली सेवा सुरु झाली

१९०३: मॉरिस गरीन यांनी पहिली टूर डी फ्रान्स स्पर्धा जिंकली.

१९४०: दुसरे महायुद्ध – केप स्पादाची लढाई.

१९४७: म्यानमारच्या सरकारचे नियोजित पंतप्रधान आंग सान त्यांच्या मंत्री आणि सहकाऱ्यांची गॅलॉन सॉ याने हत्या केली.

१९५२: फिनलंड मधील हेलसिंकी येथे १५व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.

१९६९: भारतातील १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

१९६९: नील आर्मस्ट्राँग, एडवीन ऑल्ड्रिन व मायकेल कॉलिन्स या अंतराळवीरांसह अपोलो ११ हे अंतराळयान चंद्राच्या कक्षेत पोहोचले.

१९७६: नेपाळमधे सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना करण्यात आली.

१९८०: मॉस्को येथे २२व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

१९९२: कवी मजरुह सुलतानपुरी यांना इक्बाल सन्मान पुरस्कार जाहीर.

१९९३: डॉ. बानू कोयाजी यांना समाजसेवेसाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

१९९६: अमेरिकेतील अटलांटा येथे २६व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.

१९६९: १४ बँकांचे राष्ट्रीयकरण

*जन्म /जयंती*

१८१४: अमेरिकन संशोधक सॅम्युअल कॉल्ट यांचा जन्म.

१८२७: क्रांतिकारक मंगल पांडे यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १८५७)

१८३४: फ्रेंच चित्रकार एदगार देगास यांचा जन्म.

१८९६: स्कॉटिश लेखक ए. जे. क्रोनिन यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १९८१)

१८९९: भारतीय डॉक्टर, लेखक, कवी आणि नाटककार बालाइ चांद मुखोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९८९)

१९०२: कवी, कोशकार, इतिहास संशोधक यशवंत केळकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९९४)

१९०२: भारतीय गायक, निर्माता, निर्माता आणि पटकथालेखक समृतरा राघवाचार्य यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च १९६८)

१९०९: भारतीय कवी आणि लेखक बाल्मनी अम्मा यांचा जन्म. (मृत्यू: २९ सप्टेंबर २००४)

१९३८: सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा कोल्हापूर येथे जन्म.

१९४६: रोमानियन टेनिसपटू इलि नास्तासे यांचा जन्म.

१९५५: क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांचा जन्म.

१९६१: भारतीय पत्रकार आणि लेखक हर्षा भोगले यांचा जन्म.

*मृत्यू / पुण्यतिथी*

९३१: ९३१ई.पूर्व : जपानचे सम्राट उडा यांचे निधन. (जन्म: ५ मे ८६७)

१३०९: संत नामदेव यांचे गुरू संत विसोबा खेचर समाधिस्थ झाले.

१८८२: प्राण्यांच्या वर्गीकरणा विषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ फ्रान्सिस बाल्फोर यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १८५१)

१९६५: दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमन र‍ही यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १८७५)

१९६८: बडोद्याचे महाराज प्रतापसिंग गायकवाड यांचे निधन. (जन्म: २९ जून १९०८)

१९८०: तुर्कस्तानचे पंतप्रधान निहात एरिम यांचे निधन.

२००४: जपानचे पंतप्रधान झेन्को सुझुकी यांचे निधन.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🙏संकलन/मुख्य सहप्रशासक🙏*
*✍श्री अशोक लांडगे*
95273 98365
*©मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles