
कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा महाराष्ट्र राज्य जिल्हा स्तरीय मेळावा व सहविचार सभा तथा गुणगौरव सोहळा
परभणी: कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सन्माननीय सभासद पदाधिकारी हितचिंतक आपणास कळविण्यात येते की, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा जिल्हास्तरीय मेळावा व सहविचार सभा बुधवार शनिवार 22/07/2 दुपारी 1.00 वा सम्राट अशोक बौद्ध विहार हुतात्मा स्मारक, जिंतूर जि परभणी येथे आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांच्या समस्यावर विचार विनिमय, सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार, शिक्षक पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार करण्याचे आयोजित केले आहे. या सहविचार सभा व मेळाव्यास आपण आमंत्रित आहात.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु. शंकर भारशंकर (केंद्रप्रमुख केंप्राशा आडगाव बा. ता. जिंतूर), प्रमुख पाहुणे बी. डी. धुरंधर, कार्यकारी अध्यक्ष, परसराम गोंडाणे (मुख्य संघटन सचिव, राजेश सदावर्ते (मराठवाडा विभागीय अध्यक्ष), जयद्रथ गडेराव (उपाध्यक्ष का.शि.संघटन), राहुल पाटील (राज्य प्रसिद्धी प्रमुख का.शि.सं.) प्रमुख मार्गदर्शक वय. सतीश कांबळे (राज्य सरचिटणीस) उपस्थित राहणार आहेत.
उदघाटक म्हणून रामरावजी उबाळे (संचालक, कृषी व ग्रामविकास, जिंतूर, मा. समाजकल्याण सभापती, जिल्हा परभणी) तसेच प्रमुख उपस्थिती गणेश गांजरे (गट शिक्षणाधिकारी पं.स. जिंतूर),उमेशजी गायकवाड (सहा. प्रशासन अधिकारी पं.स. जिंतूर तथा जिल्हाध्यक्ष का. क. महासंघ परभणी) मंगेशजी नरवाडे (गटशिक्षणाधिकारी पं. स. परभणी तथा जिल्हाध्यक्ष जि.प.का. क. संघटना परभणी), दीपक पंडीत (जिल्हाध्यक्ष का. शि.सं. परभणी) मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमासाठी आपण येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती कास्ट्राईब शिक्षक संघटना ता.शाखा जिंतूर जि. परभणी यांनी केली आहे.