श्रावणधारा

श्रावणधारापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

रिमझिम बरसती श्रावण धारा
मोर नाचतो फुलवून पिसारा,
मेघा गर्जून वाजवी नगारा
चोहीकडे दिसे अंधार सारा.

श्रावण धारा सरसर येती
क्षणात फिरुनी ऊन पडे,
इंद्रधनुची दिसते कमान
उधळीत येती रंग चोहिकडे.

मेघ गगणी दाटून आले
मनी भासते सूर्यास्त झाले,
बरसे पाऊस धारा जोमाने
वाहू लागले, नदी नाले.

लहरी हा,श्रावणातला पाऊस
बळीराजा, जाई कामाच्या आहारी,
लगबगीने शेती कामे आवरी
पहाते मी होऊन बावरी.

श्रावण धारा बरसल्या राणी
जिकडे तिकडे पाणीच पाणी,
कोकीळ गाते मंजुळ गाणी
चिंब चिंब,भिजावे वाटे मनी.

येता श्रावणाच्या पाऊस धारा
बहरून आली माझी काया,
मनी फुलला मोर पिसारा
निसर्गाची आहे ही किमया.

नव अंकुर या धरणीच्या उदरातून
डौलत बहरून आले वरती,
ही किमया बळीराजाच्या कष्टातून
करूया हात जोडून त्याची आरती.

मनाला मोहून टाकणाऱ्या…..
अशा या श्रावण धारा श्रावण धारा…..

कमल दवंडे परभणी
=====

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles