आलिंगन देऊ या..

आलिंगन देऊ या



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

शरीर मृत होण्याआधीच आलिंगन द्या
आयुष्य खूप छोटं आहे
भांडत नका बसू
डोक्यात राग भरल्यावर
फुटणार कसं हसू ?
अहंकार बाळगू नका
भेटा बसा बोला
मेल्यावर रडण्यापेक्षा
जिवंतपणी बोला
नातं आपलं कोणतं आहे
महत्वाचे नाही
प्रश्न आहे कधीतरी
गोड बोलतो का नाही ?
चुका शोधत बसाल तर
सुख मिळणार नाही
चूक काय बरोबर काय
कधीच कळणार नाही
चल निघ चालता हो
इथे थांबू नको
हात जोडून विनंती आहे
अशी भाषा नको
दारात पाय नको ठेऊ
तोंड नाही पहाणार
खरं सांगा असं वागून
कोण सुखी होणार ?
तू तिकडे आम्ही इकडे
म्हणणं सोपं असतं
पोखरलेलं मन कधीच
सुखी होत नसतं
सुखाचा अभास म्हणजे
खरं सुख नाहीं
आयुष्य खूप छोटं आहे
भांडत नका बसू ….ll
तुमची काहीच चूक नाही
असं कसं असेल
पारा शांत झाल्यावरच
सत्य काय ते दिसेल
बघा जरा एकांतात
डोळे मिटून आत
चूक कबूल करतांना
जोडताल दोन्ही हात
दुसऱ्याला दोष देणं
खूप सोपं असतं
वेळ आल्यावर कळतं की
कुणी कुणाचं नसतं
शक्य आहे ताण जाऊन
वाटेल हलकं हलकं
गुळणी धरून बसू नका
व्हा थोडं बोलकं
कोण चूक कोण बरोबर
हिशोब करून टाका
प्रत्येक क्षण जगून घ्या
घालवू नका मोका
कोणताही विषय असो
जास्त नका ताणू
मीच शहाणा बाकी मूर्ख
असे नका मानू
जिभेवर साखर ठेवा
होणार नाही वाद
आवडल्यावर मनातून
द्या की हो दाद
बचतच कामी येते
खर्च कमी कर
जरी मोठा झालास तरी
रहा जमिनीवर
ठीक आहे चूक नाही
तरीही जुळतं घ्या
बॉडी डेड होण्या आधीच
आलिंगन द्या
स्मशानभूमीत चांगलं बोलून
काय उपयोग आहे
जिवंतपणी कसे वागलात
जास्त महत्वाचं आहे.
ठीक आहे तुमचा आरोप
मान्य आहे मला
माझं म्हणणं एवढंच आहे
वाद नको बोला.
काय माहीत उद्या आपण असू किंवा नसू
आयुष्य खूप छोटं आहे
भांडत नका बसू …ll

डॉ ज्ञानेश्वर गुरलिंगप्पा माशाळकर गुरुजी
भारत विद्यालय बेडगा ता उमरगा जिल्हा उस्मानाबाद.
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles