हिशोब आयुष्याचा

हिशोब आयुष्याचा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

हिशोब करावा आयुष्याचा
मनात एकदा आले,
किती आले किती गेले
लिहिण्याचे नक्की झाले…१

घेतली हाती रोजनिशी
विचार करू लागलो,
ओंजळीत आयुष्याची
शिल्लक पाहू लागलो…२

पैसा आला पैसा गेला
तो कधीच नव्हता आपला,
कष्ट करूनी अपार
जरी कितीही साठवला…३

हिशोब मांडताना मी
थकून फार गेलो,
आकडेमोड जुळली नाही
पुरता हैराण झालो…४

मग ठरवले हिशोब करावा
जोडलेल्या माणसांचा,
आणि उपयोगी पडलेल्या
आपल्या नात्यांचा…५

भेटले मित्रवर्य अकस्मात
आयुष्याच्या वाटेवर
नातेवाईकही सोबत राहिले
सुखदुःखाच्या लाटेवर…६

अशी माणसे जोडली किती
हिशोब का करावे,
संकटी सापडलो असता
जर त्यांनाच स्मरावे…७

माणसे आपलीच असतात
तीच येतात आपल्या कामी
आशिर्वादाचा हात असतो
आपल्या पाठीवर नेहमी…८

हिशोब मांडला आयुष्याचा
मी जेंव्हा जेंव्हा
जोडलेली दिसली माझी माणसे
मला तेव्हा तेव्हा…९

पांडुरंग एकनाथ घोलप
कर्जत, जि रायगड

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles