‘आंतरिक स्नेहाने प्रेरित करणारे व्यक्तीमत्त्वं’; डॉ. मोहनजी भागवत

‘आंतरिक स्नेहाने प्रेरित करणारे व्यक्तीमत्त्वं’; डॉ. मोहनजी भागवत



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_मदनदासजी देवी यांना श्रद्धांजली अर्पण_

अमृता खाकुर्डीकर प्रतिनिधी

पुणे: “आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आंतरिक स्नेहाने प्रेरित करून सामाजिक कार्यासाठी सक्रिय करण्याचे फार मोठे कार्य मदनदासजींनी केले. त्यांच्या या मंत्रानुसार कार्य पुढे नेऊ या, हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल” अशा शब्दांत रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी मदनदासजी देवी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

ज्येष्ठ प्रचारक, संघाचे माजी सहसरकार्यवाह मदनदासजी देवी यांचे काल पहाटे बेंगळूरू येथे निधन झाले. त्यांचे पार्थिव पुण्यात मोतीबागेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. वैकुंठ स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी झालेल्या श्रद्धांजली सभेमध्ये डॉ. भागवत बोलत होते.

यावेळी सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबाले, प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या दुःखद प्रसंगी बोलताना डॉ. भागवत पुढे म्हणाले, ” मदनदासजींचे व्यक्तीमत्व मनाला स्पर्श करीत असे. जीवनाला योग्य दिशा देणा-या पालका प्रमाणे संघटनेचे आणि मनुष्य जोडण्याचे काम करीत असताना खूप काही सहन करावे लागते. हे सोपे नाही.

अशा ज्वाला सहन करून देखील स्वतः स्थितप्रज्ञाप्रमाणे आयुष्य व्यतीत केले. अखेरपर्यंत
ते आनंदी होते. मदनदासजी देवी यांच्या जाण्याने मनामध्ये संमिश्र भावना आहेत. जन्म-मृत्यू हा सृष्टीचा नियम आहे. लाखो लोकांना आपुलकीने बांधून ठेवणा-या व्यक्तीच्या जाण्याचे दुःख मोठे असते. मदनजींनी केवळ संघटनेचे काम केले नाही तर मनुष्य जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. मी जेव्हा त्यांच्या संपर्कात आलो तेव्हा मी स्वतः हा अनुभव घेतला. त्यांचा स्नेहस्पर्श झाला यात मी धन्यता मानतो. शाखेतील बाल स्वयंसेवकांपासून ते संघटनेच्या प्रमुखांपर्यंत प्रत्येकाशी त्यांचा निकटचा संपर्क होता. ध्येयाप्रती समर्पित कार्यकर्ते त्यांनी तयार केले.असे डॉ. भागवत म्हणाले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व अध्यक्ष मिलिंद मराठे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. “अत्यंत तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रेमळ स्वभाव आणि आत्मियता या त्यांच्या गुणांमुळे त्यांच्या प्रेरणेने देशात हजारो कार्यकर्ते तयार झाले,” असे मराठे म्हणाले.

” देशातील हजारो कार्यकर्त्यांना मदनदासजींनी कार्याची दृष्टी दिली, त्यांना जीवनदिशा देऊन त्यांच्यावर संस्कार केले आणि जीवनध्येय दिले,
त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालत राहणे आणि तो मार्ग अधिक सुदृढ करणे, ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, ” अशा शब्दांत जे. पी. नड्डा यांनी भावना व्यक्त केल्या.

शेकडो नागरिकांनी मदनदासजी देवी यांचे अंत्यदर्शन घेतले. रा. स्व. संघ आणि संबंधित संघटनांचे वरिष्ठ पदाधिकारी, मदनदासजी देवी यांचे भाऊ खुशालदास देवी, त्यांच्या भगिनी आणि कुटुंबातील अन्य सदस्य हजर होते.

केंद्रीय कार्यकारिणीचे सुरेशजी सोनी, अनिरुद्ध देशपांडे, प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, याशिवाय, विनायकराव थोरात, अभाविप संघटन मंत्री आशिष चौहान, सहकार भारतीचे संजय पाचपोर, भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, ज्येष्ठ कार्यकर्त्या गीताताई गुंडे, गिरीश प्रभुणे इत्यादी मान्यवरांनी श्रद्धांजली वाहीली.
मदनदासजी देवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ३१ जुलै रोजी दिल्लीत, ७ ऑगस्ट रोजी पुण्यात आणि ८ ऑगस्ट रोजी मुंबईत श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles