वर्धा जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे भव्य मेळावा व सत्कार समारंभाचे आयोजन

वर्धा जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे भव्य मेळावा व सत्कार समारंभाचे आयोजन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

राज्य कार्यकारणीचे पदाधिकारी सभासदांना करणार मार्गदर्शन

वर्धा: कास्ट्राईब शिक्षक संघटना वर्धा तर्फे चेतना डी एड कॉलेज, देवळी रोड वर्धा येथे शिक्षक संघटनेचा जिल्हा मेळावा व सत्कार समारंभ दिनांक 29/07/23 रोजी शनिवार, दुपारी १२.०० वा आयोजित करण्यात आला असून, या समारंभास राज्य कार्यकारणीचे पदाधिकारी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष प्रमोद मुरार हे राहणार असून, जिल्हा मेळाव्याचे उद्घाटक कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष बी. डी. धुरंधर असणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून राज्य सरचिटणीस सतीश कांबळे, राज्य मुख्य संघटक परशराम गोंडाणे, राज्य प्रसिद्धी प्रमुख राहुल पाटील, वर्धा प.स .चे मुख्यलेखा अधिकारी आशिष दहिवाडे, केंद्र प्रमुख चरणदास चारभे, केंद्र प्रमुख प्रशांत म्हैसकार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

जिल्हास्तरीय मेळावा व सत्कार समारंभ कास्ट्राईब जि प संघटनेचे उपाध्यक्ष रमेश वानखेडे, कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष आम्रपाल कांबळे, कोषाध्यक्ष सुधीर मुरार, राज्य कार्यकारणी सदस्य उमेश फुलमाळी, माजी अध्यक्ष राजु थुल यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे.

या सभेत मागासवर्गीयाचे मूलभूत प्रश्न, प्रलंबित असलेले पदोन्नती व इतर महत्वाच्या प्रश्नावर चर्चा करण्यात येणार असून, जिल्ह्यातील सर्व मागासवर्गीय सभासद तसेच शिक्षक वृंदानी या मेळाव्याला उपस्थित रहावे असे आवाहन कास्ट्राईब शिक्षक संघटना वर्धा जिल्हा कार्यकारणीने केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles