सतीश कांबळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या उपाध्यक्षपदी

सतीश कांबळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या उपाध्यक्षपदी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

परभणी: कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस सतीश कांबळे यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे महाराष्ट्रातील वातावरण, संघटन कौशल्य, कामाची प्रगती, केलेल्या कामाची नोंद तसेच सतीश कांबळे यांच्याकडे महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधव एक तरुण नेतृत्व म्हणून पाहत आहेत.

आदरणीय कृष्णा इंगळे साहेबांनी जिल्हाध्यक्ष विभागीय अध्यक्ष महाराष्ट्राचे शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस पद या सर्व बाबींची नोंद घेऊन मध्यवर्ती संघटनेची बैठक व त्यामध्ये असलेल्या सर्व शिक्षक संघटनांची बैठक होऊन उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली याबद्दल शिक्षक संघटनेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी पतसंस्था जिल्हा परभणी या ठिकाणी त्यांचा सत्कार घेण्यात आला.

यावेळी गौतम दादा साळवे राजू अंभोरे सर विशाल प्रधान शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पंडित आधार बँकेचे मॅनेजर सपाटे साहेब हे या कार्यक्रमावेळी उपस्थित होते. परभणी जिल्ह्यातून व महाराष्ट्रातून या निवडीबद्दल सतीश कांबळे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे तसेच माननीय कृष्णा इंगळे साहेब डीडी धुरंदर सर परसराम गोंडाने सर विजयकुमार जाधव सर व महाराष्ट्रातील तमाम शिलेदारांच्या वतीने सतीश कांबळे अभिनंदन करण्यात येत आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles