मोरगाव येथे विद्या समीक्षा केंद्र व प्रथम शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

मोरगाव येथे विद्या समीक्षा केंद्र व प्रथम शिक्षण परिषद उत्साहात संपन्नपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अर्जुनी/मोर: २१व्या शतकात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शैक्षणिक प्रक्रिया गतिमान करणे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेद्वारे विद्या समीक्षा केंद्र तसेच डायटद्वारे शिक्षण परिषदेचे आयोजन व उद्बोधन जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, मोरगाव येथे उत्साहात संपन्न झाले.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, मोरगाव च्या उच्चश्रेणी मुख्याध्यापक रेखा गोंडाणे तर, प्रमुख अतिथी म्हणून गटसमन्वयक सत्यवान शहरे, केंद्र मुख्या. सरिता घोरमारे , इंदिरा कापगते, लीना ब्राम्हणकर ,खुशाल कोडापे, केंद्रातर्गत मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

याप्रसंगी अर्जुनी/मोर चे केंद्रप्रमुख सु.मो भैसारे यांनी प्रास्ताविक भाषणातून , विद्या समीक्षा केंद्र-भूमिका व महत्त्व विषद केले. तसेच कार्यशाळेचे उद्बोधन करून शिक्षकांची तंत्रज्ञान विषयक पूर्वज्ञान चाचणी घेतली. स्विफ्ट अँपचे माध्यमातून शिक्षक – विद्यार्थी – प्रशासन – पालक यांचे द्वारे विद्यार्थी गुणवत्ता विकासनासाठी उपयुक्तता स्पष्ट केले.

शैक्षणिक सत्र-२०२३-२४ मध्ये डायटद्वारे एकूण ११ शिक्षण परिषदेचे नियोजन करण्यात आले असून, शिक्षकांनी बदलत्या अध्ययन – अध्यापन पद्धती, बदलते शैक्षणिक धोरण व तंत्रज्ञान विषयक ज्ञान आत्मसात करून, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकसनासाठी तत्परतेने कार्य करण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे. शिक्षण परिषदेमध्ये सेतू अभ्यासक्रम, अध्ययननिश्चिती, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आदि विषयावर मार्गदर्शक पी.टी.गहाणे,जितेंद्र ठवकर, सरिता घोरमारे आदींनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम गहाणे यांनी केले; तर आभार विलास भैसारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वामन घरतकर, अचला कापगते, प्राची कागणे, लीना नवरंग, सिमरण हातझाडे, निशिगंधा पर्वते, स्नेहा मानकर आदींनी सहकार्य केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles