बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ९६ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे. नसेल पाठवायचे तर नकार तरी द्यावा*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*छत्रीच्या वेदना*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

ऊन असो वा असो वारा
घेई डोईवर जलधारा..
वेदना कितीही जाहल्या
देई सा-यांनाच निवारा..

थेंब निथळून खाली
तन जपते गं तुझे..
सोसते गारांचाही मारा
जगणं मरणं धीट माझे..

कधी दारूड्याच्या हाती
कधी वृद्धत्वाची काठी..
मर्जी राखण्या तत्पर
सदा प्रेमी युगुलांसाठी..

वक्राकार लांब काठी
बनते सा-यांचा आधार..
दणकट देह दांड्यावर
कधी वाहे बाजार भार..

किती साहु किती सांगू
या मी छत्रीच्या वेदना..
अंग सारे फाटते टाचते
कुणा जाणवेना संवेदना..

उद्या मी असेन नसेन
होतोय जीव घाबरा..
सूर जरी माझा मुका
ठेवा जपून हो कोपरा..
ठेवा जपून हो कोपरा..

*सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा*
*मुख्य परीक्षक/प्रशासक/ कवयित्री*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☔🌂☔♾️♾️♾️♾️
*छत्रीच्या वेदना*

पावसाळा लागला की
छत्रीची होते आठवण
चार महिने तर तिच्याशी
जुळून राहते मन

लहान मुलांना असते
भरपूर तिची आवड
तिच्या रंगसंगतीत रमून
करतात जणू दोघे गडबड

छत्री निःस्वार्थ पणे
करते आपली मदत
पण मनुष्याला तर
स्वार्थापणाची लागली आदत

आपले अंग भिजू नये म्हणून
पावसाच्या धारा ती झेलते
होत असेल छत्रीला वेदना
तरी मुकाट्याने सहन करते

नेहमी आपले संरक्षण करते
तिला योग्यरितीने वापरा
पुढच्या वर्षी पुन्हा यावी उपयोगी
म्हणून सुरक्षित असू द्या तिचा कोपरा

*कुशल गो डरंगे, अमरावती*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☔🌂☔♾️♾️♾️♾️
*छत्रीच्या वेदना*

छत्री दिसते किती सुंदर
उपयोग तिचा मजेदार
असतेच सोबती बरोबर
जेंव्हा पाऊस डोक्यावर!

रंग बेरंगी मऊ उबदार
उघडता दिसे गोलाकार
मनात भरते ही लवकर
सगळ्यांचे प्रेम छत्रीवर!

छत्रीविना नाही कळणार
पावसाचा मारा जोरदार
उन्हात देई सावली फार
जीवाला आराम जरूर !

पाऊस हा संपल्यावर
फेकून देता मला दूर
जशी मी झाले बेकार
भरोसा ठेऊ कुणावर!

लहान मोठे अन थोर
घ्या काळजी वर्षभर
ठेवा मला जपून फार
पुन्हा मी कमी येणार!

रेनकोट रे विसरल्यावर
होईल माझाच रे वापर
माझ्याविना रे भिजणार
जाणून घ्यावे सत्य खरं!!

*श्री अशोक महादेव मोहिते*
बार्शी जिल्हा सोलापुर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☔🌂☔♾️♾️♾️♾️
*छत्रीच्या वेदना*

घन ओथंबून आले
विजेचा नाच नभी रंगला
आठवण माझी तेव्हाच आली
बाहेर जाण्या जीव खोळंबला

अडगडईतून श्वास मिळाला
प्रेमळ स्पर्शाने उजळले तन मन
हलवून उघडता झटकला आळस
मम अधरी फुलले हास्य सुमन

आजोबा म्हणाले हवी मला एक
मुलाला फन्सी छत्रीचे वेड
नटव्या बहिणी येती जरी घरा
मदत माझी आसऱ्याची परतफेड

जुनी झाली म्हणून टाकू नका
मजबूत कमच्यांची पकड भारी
करेन रक्षण मुसळधार पावसात
वादळवारा झेलायची माझी तयारी

काही महिने मला मोकळा श्वास
आठ महिने पिंजऱ्यात असे बंद
एकटीच साहे वेदना माझ्या
ऐकेल का कोणी माझे आक्रंद

नको सालभर प्रेम वर्षा मजला
चार महिन्यांची पुरेशी ती सर
जपेन साऱ्यांना हृदय गाभाऱ्यातून
द्याल का हो मजला प्रेमाची फुंकर

*कु. संगीता रामटेके/भोवते*
साकोली, भंडारा
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️☔🌂☔♾️♾️♾️♾️
*छत्रीच्या वेदना*

उन्हात तापणे पावसा भिजणे,
अशी आहे माझ्या जीवनाची कथा…
किती सहते उन्हं पाऊस वार,
हू की चू करीत नाही यथा तथा…१

कधी गरिबांची कधी श्रीमंतांची,
गरज भागवते मी निरंतर…
कधी जीर्ण तर कधी ठिगळात,
संरक्षण देते मी जीवनभर… २

प्रेम जोडप्याचे ओठांचे चुंबन,
लपवता,… माझेच मी थरारते…
कधी रस्त्यावर कधी आडोशाला,
डोळे मिटून बघते….. शरारते…३

सारं सहते मी माघार न घेते,
दुःखात सुखाची करते साधना…
*सुधाकरा* ऐकून घ्या जरा तुम्ही,
गरिब बिचाऱ्या छत्रीच्या वेदना…४

*सुधाकर भगवानजी भुरके गुमथळा नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह नागपूर*
♾️♾️♾️♾️☔🌂☔♾️♾️♾️♾️
*छत्रीच्या वेदना*

बिचाऱ्या छत्रीच्या वेदना
कळेना झाल्यात कुणाला
अडगळीत पडलेला जीव
हाय खात बसतेय मनाला

वळचनित कुढत बसलेली
आठ महिने गुपचुप असते
पाऊस सूरू झाला एकदा
साऱ्यांच्या नजरेत खीळते

काळीकुट्ट होती ती तरीही
उन्हातान्हात सावली द्याची
अवतरली रंगीबेरंगी ढंगात
तरी हौसपूर्ती नाही मनाची

ओढाताण होते तिची जवा
ती तिघात एकटीच असते
फजिती करून घेती स्वतः
भिजू नये प्रत्येकास वाटते

पाऊस सुरू असेपर्यंत ती
सगळ्यांच्या असते सोबत
उघडीप होता पाऊसपाणी
तिज टाकून द्यायची नौबत

हातपाय मोडले तुटले तरी
देखभाल दुरुस्ती व्हायची
आता बाजूला टाकून तिला
तयारी रेनकोट वापरायची

*✍️बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☔🌂☔♾️♾️♾️♾️
*छत्रीच्या वेदना*

पाण्या तुला कसे मी
बोलवू या घडीले
हा जाणेना छत्रीच्या वेदना
गळतो बरसूनी…

मी फाटली तुझा रे
करीश्मा पाहून पावसा
हा एवढा झड लावतो
कहरतो बरसूनी…

दांड्या सकट उलटी झाली
कापड भिजले अंगातले
हा वारा तारांबळ करतो
छळतो अती बरसूनी…

वीजा कडाडल्या नभी
करी बरसात तडाकुनी
भाजते की काय छत्री
गर्जतो घन बरसूनी…

रेनकोट घोंगडी सहाऱ्याने
अन्याय छत्रीवरी एकतर्फी
सांगू अडगळीतल्या वेदना
शिवतो मला बरसूनी…

ऊन्हाचा बचाव कराया
सावली देते छ्त्री मैत्री
भोवळ न यावी तुला
दडतो खूशाल बरसूनी…

*प.सु. किन्हेकर*
*वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☔🌂☔♾️♾️♾️♾️
*छत्रीच्या वेदना*

नुसत्या कठोर बोलाने
पडतात घाव हृदयाला
त्यांच्या होतात वेदना
ह्या चंचल नाजूक मनाला

का येत नाही दया तुला
मेघा मला सांग ना,,,,!
जाणून घे रे आता तरी
त्या बेबस , निर्जीव छत्रीच्या वेदना

किती शुकशुकाट ती
एकटीच असते घरी
नाही कुणी बोलायला
नाही नेत कुणी बाहरी

तापली रे धरती माता
बरसव रे तू आता
ओले होईल मन छत्रीचे
होईल तिच्या मनाचे

कधी येतोस वाऱ्यासवे
कधी येतोस कडाडून
तिचा रंग रूप उडून जातो
कधी जाते फाटून,,,,,

कमीत कमी रिमझिम तरी
निघेल ती बाहरी
वेदना तिच्या होतील कमी
ती येईल लोकांच्या कामी

जाणून घे रे वेदना
करू नकोस मना
ही संधी आहे येण्याची
आपला रूतबा दाखवण्याची

जाणून घे रे बळीच्या वेदना
तो झाला चिंतातूर
शुकशुकाट झाले शेत
निघतोय नयनातून अश्रू पूर

छत्रीच्या वेदना होतील कमी
आनंद मिळेल सर्वांना
बळीचे मन जे होईल शांत
मानवाला सुध्दा मिळेल सांत्वना

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☔🌂☔♾️♾️♾️♾️
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*छत्रीच्या वेदना*

पाऊस आणि छत्रीचं
वेगळंच आहे समीकरण
बरसल्या जलधारा कि
येते छत्रीची आठवण

पावसात बाहेर पडताना
हाताशी हवी छत्री
पावसापासून रक्षणाची
देते हमखास खात्री

सोसाट्याच्या वाऱ्या समोर
तोल जाता डगमगते
कधी उलटी कधी सरळ होतं
अंगावर पाऊस धारा झेलते

रंगीबेरंगी रेनकोटला
पिढी आजची भुलली
जीणे जपले पिढ्यांना
ती छत्री अडगळीत पडली

अंगावर धुळ साचलेली
उघडलीच कधी चुकून
मनावरच ओझं कमी करत
घेते पावसात मनसोक्त रडून

छत्रीच्या वेदना कधी
कळल्या ना कुणाला
स्वतः झेलून पाऊसधारा
सुरक्षित ठेवले तुम्हाला

पाऊस आणि छत्रीचं
असं आहे गहिरं नातं
पावसालाच कळतं फक्त
तिच्या मनावरच ओझ.

*सौ. इंदू मुडे, ब्रम्हपुरी*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☔🌂☔♾️♾️♾️♾️
*छत्रीच्या वेदना*

आडगळीच माझी जागा
पाऊस पडू लागला
झाली माझी आठवण
माळ्यावरून काढले मला

अंगावर साचली होती धूळ
लक्ष नव्हते कुणाचेच माझ्याकडे
पाऊस पडू लागला धो धो
सगळे धावले माझ्याकडे वेडे

काय सांगू छत्रीच्या वेदना
पाऊस आला की आठवण
वर्षभर कोणीच पाहत नाही
आडगळ खोलीतली साठवण

धो धो पावसाचा वाहती धारा
झेलत असतो मी पावसाचा मारा
डोक्यावर चढवून ठेवतात मला
सुरक्षितेसाठी घेतात माझा सहारा

कसं सांगू या छत्रीच्या वेदना
रात्रंदिवस घेतात माझा सहारा
टपोरा पाऊस झेलतो अंगी
खाते मग मी पावसाचा मारा

*सौ.कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☔🌂☔♾️♾️♾️♾️
*छत्रीच्या वेदना*

अडगळीतून काढून त्याने हळूच मज कुरवाळले
ढग येता दाटून त्याने काॅलर मध्ये मज माळले

कधी घेवून जातो फिरायला धावून येती कुत्रे
बनवून मज झोडपा मग कुत्र्यास पिटाळले

बरसल्या पाऊसधारा मी केला सामना सरींचा
भर पावसात ही बघा त्यांचे कपड़े दिसती वाळले

उन, गारा, पाऊस यांचे मीच केले संरक्षण
छत्रीच्या वेदना कुणा समजल्या मीच माझे अश्रू ढाळले

आता जरीही बदलले काळानुसार रंगरूप माझे
जुनी पिढी अजुनही आहेत माझ्यावर भाळले

*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☔🌂☔♾️♾️♾️♾️
*छत्रीच्या वेदना*

पावसाळा संपता क्षणीच
मी अशी अडगळीत जातेय
गरज सरो आणि वैद्य मरो
अशीच माझी अवस्था होतेय.. //

माझ्या वस्त्ररूपी त्वचेला
निर्दयी उंदीर कुरतडतात
जागच्या जागी कैक दिवस
नाजूक अवयव आखडतात…//

अशीच निपचित पडलेली
भिजत कोरड्या आसवात
दुःखी कष्टी, उदास मनाला
मी हरवून घेते ह्रद्य आठवात… //

जातील तिकडे बाबा मला
खांद्यालाच लटकून न्यायचे
भर पावसात मला पांघरत
अगदी सुखरूप घरी यायचे… //

बाजार, शाळा, दवाखाना
हर घडी आईच्या दिमतीला
आईच पाठवायची हक्काने
अडल्या नडल्याच्या मदतीला… //

फक्त रेनकोटांच्या प्रेमाखातर
ताई दादाने घेतलीय फारकत
अन्यथा माझ्या साथ संगतीची
नसे कधीच कुणाला हरकत… //

कांही गोड गुलाबी स्मृतींनी
तशातही अंग अंग शहारते
रंग माझा काळाच तरीही
या अंतरंगात इंद्रधनू बहरते.. //

सांगा कोण समजून घेतय
या दुःखर्‍या छत्रीच्या वेदना
आजकाल आहेत का जाग्या
कुणाच्या इतक्या संवेदना…?

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles