बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चारोळ्या

➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ९६ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे. नसेल पाठवायचे तर नकार तरी द्यावा*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*छत्रीच्या वेदना*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

ऊन,वारा, पाऊस मी झेलतो
तुम्हाला सावली देण्यासाठी
छत्रीच्या वेदना जाणून,सोबत
घ्या मला तुमच्या बचावासाठी

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☔🌂☔♾️♾️♾️♾️
*छत्रीच्या वेदना*

छत्रीच्या वेदना घेण्या समजून
छत्रीच्या गाव मी गेले
स्वतः संकटे झेलून आनंद देण्याचे
गमक मला खरे उलगडले

*डॉ.पद्मा जाधव-वाखुरे,औरंगाबाद*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☔🌂☔♾️♾️♾️♾️
*छत्रीच्या वेदना*

*छत्रीच्या वेदना* छत्री जाणे
तिन्ही ऋतूंत तिलाच मान
जीवापाड तिलाच जपणे
असे करती तेच कदरदान

*श्री नितीन झुंबरलाल खंडागळे*
*अंबरनाथ जि. ठाणे*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️☔🌂☔♾️♾️♾️♾️
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*छत्रीच्या वेदना*

*भर पावसात छत्री करते*
*पावसाशी सामना*॥
*पण कुणीही जाणत नाही*
*बिचार्‍या छत्रीच्या यातना*॥॥॥॥

*डाॅ. नझीर शेख राहाता*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☔🌂☔♾️♾️♾️♾️
*छत्रीच्या वेदना*

वात प्रवाहासवे वहावे
शिकवल्या तिने संवेदना
जाणिल्या न परि कोणी
वर्षाव थोपवे त्या छत्रीच्या वेदना

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☔🌂☔♾️♾️♾️♾️
*छत्रीच्या वेदना*

जाणून घेवू आपण सारे
छत्रीच्या वेदना,अंतरीच्या,
देवू नये, फेकून काम संपताच
आठवणी जतन करू पावसाळ्याच्या.

*मायादेवी गायकवाड मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️☔🌂☔♾️♾️♾️♾️
*छत्रीच्या वेदना*

उन पावसात देई संरक्षण,
तरी थांबे ना तिची फरफट,
बिघाड होता फेकून देई केरात ,
कोणीच न जाणे त्या छत्रीच्या वेदना||

*सौ. उर्मिला गजाननराव राऊत*
*फ्रेंड्स कॉलनी नागपूर*
*©सदस्य- मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️☔🌂☔♾️♾️♾️♾️
*चारोळी – छत्रीच्या वेदना*

वेदना छत्रीच्या त्या
कितीतरी सतावतो..
पाऊस नाही आला तर
तीला जो तो भारच समझतो..

*प्रतिभा गौपाले नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles