वर्धा जिल्ह्यात रेड अलर्ट, आज सुटी जाहीर; हिंगणघाट व समुद्रपुरात पावसाचा हाहाकार

वर्धा जिल्ह्यात रेड अलर्ट, आज सुटी जाहीर; हिंगणघाट व समुद्रपुरात पावसाचा हाहाकार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वर्धा: शहरातील अनेक ठिकाणी काल रात्रीपासून पावसाने हजेरी लावल्याने हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असून, जिल्हाधिकारी कर्डीले यांनी आज दि २७/०७ रोजी सुटी जाहीर केली आहे.

हिंगणघाट तालुक्यातील वाघोली ते खैराटी नाल्याला पुर असल्याने रस्ता बंद आहे. समुद्रपूर तालुक्यातील वासी जवळील पुलावरून पाणी असल्याने नंदोरी वासी रस्ता सद्या बंद आहे. हिंगणघाट तालुका चानकी ते भगवा रोड बंद झाला आहे.हिंगणघाट शहरात महाकाली नगरी मध्ये काही ठिकाणी पाणी घुसले आहे.

हिंगणघाट तालुका चिंचोली ते हिंगणघाट रस्ता बंद आहे. समुद्रपूर तालुका वाघाडी नाला समुद्रपुर- वर्धा मार्ग (शेडगाव मार्गे) बंद झाला आहे. याच तालुक्यातील भोसा – सिंधी मार्ग बंद आहे.

हिंगणघाट तालुक्यातील हिंगणघाट ते येणोरा, कुंभी ते सातेफळ रस्ता बंद झाला आहे. तसेच पोहणा ते वेणी नाल्याला पूर असल्याने मार्ग बंद झाला आहे. समुद्रपूर तालुक्यातील हमदापुर कांढळी रोडवरील उमरा पुलावरुन पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles