दोन महिन्यात बुलढाणा शहरासह 4 गावांना करावा लागणार पाणी टंचाईचा सामना.

दोन महिन्यात बुलढाणा शहरासह 4 गावांना करावा लागणार पाणी टंचाईचा सामना.



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_येळगाव धरणात आहे,15 टक्के पाण्याचा अल्पसाठा_

बुलढाणा: सहा ते सात दिवस अगोदर बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला होता. मलकापूर, नांदुरा,जळगांव जामोद आणि संग्रापुर या तालुक्यातील सगळ्याच नदी नाल्यांना पूर येवून अनेक गावांमध्ये आणि शेतामध्ये पुराचा पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी हानी झाली.

असे असतांना येणाऱ्या दिढ ते दोन महिन्यात बुलढाणा शहर व परिसरातील 4 गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे, आत्ता तुम्ही म्हणणार बुलढाणा जिल्ह्यात तर मुसळधार पाऊस पडलाए आणि बुलढाण्यात पाणीटंचाई कशी उदभवणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यात सहा ते सात दिवस अगोदर मुसळधार पाऊस पडलाय, मलकापूर, नांदुरा,जळगांव जामोद आणि संग्रापुर या तालुक्यातील सगळ्याच नदी नाल्यांना पूर येवून अनेक गावांमध्ये आणि शेतामध्ये पुराचा पाणी शिरल्याने मोठा नुकसान झाला आहे, जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडलाय मात्र बुलढाणा तालुक्यात अल्प प्रमाणात पाऊस झाला आहे.

यामुळे बुलढाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात पाणीसाठा वाढलाय नाहीये.यामुळे येणाऱ्या दिढ ते दोन महिन्यात बुलढाणा शहर व आसपासच्या 4 गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे…बुलढाणा तालुक्यातील दहित,गुम्मी,चौथा,पाडळी आणि देऊळघाट परिसरात जोरदार पाऊस पडल्यानंतर हा पाऊस येळगाव धरणाचा पाण्याचा साठा वाढविवतो,मात्र या भागात जोरदार पाऊस न झाल्याने येळगाव धरणात पाण्याचा साठा वाढला नाहीये, तस येळगाव धरणाची पुर्ण क्षमता 12.40 दशलक्ष घनमीटर एवढी असून सद्या स्थितीत येळगाव धरणात 2.10 दशलक्ष घनमीटर म्हणजे 15 टक्के एवढा पाण्याचा साठा राहिलाए,सध्या 4 दिवस आड पाणीपुरवठा केल्या जात आहे.जर पावसाची अशीच परिस्थिती राहीली तर येत्या दिढ ते दोन महिन्यात बुलढाणा शहरासह 4 गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याची माहिती बुलढाणा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आलाय.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles