धारदार शस्त्र बाळगणारा जेरबंद

धारदार शस्त्र बाळगणारा जेरबंदपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुसद तालुका प्रतिनिधी

पुसद: यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध्य धंदे सुरू राहणार नाही तसेच अवघड गुन्हे आरोपी शोध अवैद्य धंद्याचे समूळ उच्चाटन व्हावे याकरिता माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशित केले होते त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्त पथकांना गोपनीय माहिती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबतच्या सूचना दिल्या आहेत.

दिनांक 25/7 /2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस स्टेशन वसंत नगर हद्दीतील मौजे मधुकर नगर येथील इसम नामे सुरेश शंकर कांबळे हा त्याचे घरात सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था भंग करून दखलपात्र गुन्हा करण्याचे इराद्याने लोखंडी धारदार तलवार बाळगून आहे अशी मूकबिराद्वारे खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठून माहिती मिळाली त्याप्रमाणे इसमाची घर झडती घेतली असता त्याचे घरातून एक धारदार तलवार मिळून आल्याने सदर इसम नामे दुरे शंकर कांबळे वय 25 वर्ष राहणार मधुकर नगर तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यास ताब्यात घेऊन त्याचे विरुद्ध वसनगर पोलीस स्टेशन पुसद येथे आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉक्टर श्री पवन बनसोड अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ जगताप श्री आधार सिंग सोनवणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल सांगळे सहायक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे पोहवा तेजाब रणखांब पोहवा सुभाष जाधव नायक पोलीस कॉन्स्टेबल कुणाल मुंडो कार सोहेल मिर्झा पंकज पातुरकर सुनील पंडागळे मोहम्मद ताज दिगंबर गीते सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या कार्यवाही करीत धारदार शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस जेरबंद केले पुढील तपास पोलीस स्टेशन वसंत नगर पुसद हे करीत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles