वनपालाच्या आडमुठी धोरणाविरुद्ध वन मजूरचे उपोषण

वनपालाच्या आडमुठी धोरणाविरुद्ध वन मजूरचे उपोषणपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुसद तालुका प्रतिनिधी

पुसद: वन कामगार (संरक्षण) परीक्षेत्र पुसद अंतर्गत पुसद परीक्षेत्रामध्ये तीस वर्षे / पाच वर्षे पासून वृक्षलागवड योजने अंतर्गत गट लागवड, रस्ता दुतर्फा मध्ये लावलेल्या झाडांची संरक्षण संगोपन व देखभाल ची कामे करून ईतर कामे जसे मरगड भरणे, निंदण करणे, आहळे करणे, ट्रॅक्टर द्वारे पाणी देण्याचे काम करणाऱ्या कामगारांनी आपल्या मागण्या साठी आंदोलन उभारले आहे.

एक वनमजुर ३ कीमी अंतरावरील सर्व कामे केल्यावर ठरलेल्या दरप्रमाणे पगार दिल्या जात होते पण मे २०२३ पासून वन रक्षक या पदावरून वनपाल या पदावर नियुक्त झालेले श्री. लांडगे पदभार स्वीकारल्या बरोबर त्यांचे कडे दोन साईट ताब्यात देण्यात आले. आज पर्यंत संरक्षण मजुराचा जो पर्यंत ती साईट हस्तारण होत नाही तोपर्यंत ३ वर्ष त्याच जागी संरक्षणाची कामे मिळत होती.

लांडगे वनपाल यांनी आपल्या आर्थीक स्वार्थासाठी ३ महिण्यामध्ये सात मजुर (संरक्षण) याची जानुन बुजुन बदली केली. जवळच्या व एका गाडीत जाने-येणे करणाऱ्या दूरची कामे देऊन त्रास देण्याची कामे केली. प्रतिमजुर (संरक्षण) प्रतिपहिना तीन हजार रकमेची केली त्याची पुर्तता न केल्यास एका महिण्यात आठ दिवस दुसन्या महिण्यात तेवीस दिवस गैरहजर दाखवुन मजुराची सही न घेता पगार खात्यात टाकण्याची कामे केली. जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमचे असेच नुकसान होणार असे मजुरांना धमकी देत आहेत. तसेच तीन महिण्यानंतर कामावरून चंद भाषा करीत आहेत. अशी वनमजुरांची तक्रार आहे.

शासन निर्णय २०१२ या नुसार तीन महिण्यांच्या वर मजुर लावण्यात येऊ नये. या जी. आर. ची भीती दाखवित असल्याचेही वनमजुरांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. पण हा निर्णय पुसद परिक्षेत्रा पुरता नसुन संपुर्ण महाराष्ट्राचा आहे. मजुरांना रोजगार मिळावे करीता वृक्षलागवड योजना कार्यान्वयीत करण्यात आली आहे. मजुराच्या नावे तीन महिने नंतर तीन महिने कुटुंबाच्या सदस्याला कामावर दाखवून रोजगाराचा प्रश्न मिटत आहे. वरील जी. आर. चा गैरफायदा घेऊन वनपाल आपले ध्येय साध्य करत आहे. या विषयी चौकशी करावी. चौकशी करताना खालील बाबीचा विचार करावा. तक्रारीत नमूद केले आहे.

नाविन्यपूर्ण योजना, दोन कोटी पासून २०१५ – २०१६ पासुन सुरुवात झाली. दोन कोटी, चार कोटी, तेरा कोटी, तेहत्तीस कोटी पासुन ते नोव्हेंबर २०२३ पर्यंत संरक्षण मजुराचा पगार सव्वीस दिवसाचा करण्यात आला. तपासणी एम.बी (मेसरमेंट बुक) मध्ये करता येईल. संबंधित वनपाल यांनी पैशाची मागणी सहा मजुरांकडे करण्यात आली पण सही दहा मजुर करीत आहे. कारण आज त्यांना मागणी करण्यात आली तीच वेळ बाकीच्या मजुरांवर येईल. असेही मजुरांचे मत आहे.

तक्रार केल्यावर आम्हा सगळ्यांना माहीत की आम्हाला कामावरून काढण्यासाठी जाणून- अजून त्रास देण्यात येईल व कामावरून काढण्यात येईल. योग्य तन्हेणे चौकशी न करता जर आम्हाला कामावरून बंद करण्यात आले तर यापुढील लढा संघटनेमार्फत लढू व या विभागातील झालेला संपूर्ण भ्रष्टाचार ऊघडकीस आणु. असा इशाराही वनमजुरांनी दिला आहे तेव्हा वरिष्ठांनी वनमजुरांच्या समस्या कडे जातीने लक्ष देऊन वन मजुरांच्या समस्या निकाली काढाव्यात या मागणी साठी वन मजुरांचे उपोषण सुरू.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles