श्रीवर्धनच्या आराठी मेटकर्णी येथे पुन्हा डोंगरावरून मोठ्या प्रमाणात भूस्खलन , नागरिकांचा जीव टांगणीला

श्रीवर्धनच्या आराठी मेटकर्णी येथे पुन्हा डोंगरावरून मोठ्या प्रमाणात भूस्खलन , नागरिकांचा जीव टांगणीला



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_प्रशासनाकडे उपाययोजनेची मागणी_

रायगड: जिल्ह्याला सलग अतिवृष्टीने झोडपले आहे. जिल्ह्यातील अनेक भागात कुठं घरे कोसळत आहेत, कुठं दरड तर कुठं वृक्ष उन्मळून पडतायेत. अनेक ठिकाणी मानवी वस्तीलगतच्या डोंगर पठारावरून दगड व मातीचे ढीग कोसळत आहेत. आज अतिमूसळधार पावसात श्रीवर्धनच्या आराठी मेटकर्णी येथे पुन्हा डोंगरावरून मातीचे ढीग येऊन मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झालेय. त्यामुळे येथील नागरिकांचा जीव टांगणीला लागलाय.

इर्शाळ वाडीतील मोठ्या दुर्घटनेनंतर नागरिकांच्या मनात भय निर्माण झालेय.आराठी ग्रामपंचायतचे उपसरपंच मुजफ्फर महबूब शेख यांच्या राहत्या घराच्या शेजारी लाल मातीसह दगड कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही पण त्यांच्या शेजारील पडवी मात्र तुटून खाली पडलीय. याठिकाणी घरे व शाळा असल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन शासनाने त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आलीय.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles