पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर बीडमध्ये पाऊस शेतकऱ्यांना दिलासा तर सखल भागात पाणी साचले

पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर बीडमध्ये पाऊस शेतकऱ्यांना दिलासा तर सखल भागात पाणी साचले



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

बीड: पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर आज बीडमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसाने बीड शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अहमदनगर रोड, जालना रोड, बशीरगंज, शाहूनगर, या सखल भागामध्ये नालेसफाई न झाल्याने नाल्यातील सर्व पाणी रस्त्यावर आले.

शहरातून जाणाऱ्या मुख्य बीड/अहमदनगर महामार्गाच्या कडेला असलेले नाले मान्सूनपूर्व स्वच्छ करणे अपेक्षित होत. मात्र नगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं. परिणामी केवळ तासभर झालेल्या पावसानं रस्त्यावर पाणी साचले आहे त्यामुळे वाहनधारकांना अचूक अंदाज घेऊन वाहन चालवावे लागतेय. याच महामार्गावर मोठे मोठे खड्डे देखील पडले आहेत.

बीडसह माजलगाव, गेवराई, वडवणी या तालुक्यात देखील पाऊस झाला. दरम्यान या पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. मागील काही दिवसात पावसाचा खंड पडला होता. मात्र आज झालेल्या पावसाने काही अंशी का होईना दिलासा मिळाला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles