अहेरी आगाराच्या बसचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, एसटी महामंडळाने घेतला मोठा निर्णय

अहेरी आगाराच्या बसचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, एसटी महामंडळाने घेतला मोठा निर्णय



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_राज्यातील सर्व आगर प्रमुखांना दिल्या महत्त्वाच्या सूचना_

_गडचिरोलीच्या यंत्र अभियंत्यांचे केले निलंबन, एसटी महामंडळ प्रशासनाची माहिती_

गडचिरोली: जिल्ह्यातील अहेरी आगाराची बस गडचिरोली मुलचेरा महामार्गावर धावत असताना वाहकाच्या बाजूचा बसचा छत उकडून हवेमध्ये उडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता या घटनेची गंभीर दखल एसटी महामंडळ प्रशासनाने घेतली असून गडचिरोली विभागाचे यंत्र अभियंता एस आर बिराजदार यांना निलंबित करण्यात आले आहे.

यासोबतच वाहनाची त्रुटी न करता अथवा वाहन दुरुस्त न करता प्रवासी वाहतुकीसाठी पाठवू नये अशा सूचना आता एसटी महामंडळ प्रशासनाने या घटनेनंतर राज्यातील सर्व अगर प्रमुखांना दिल्या आहेत. एसटी महामंडळाने या व्हायरल व्हिडिओची दखल घेऊन थेट विभागीय कार्यालयातील यंत्र अभियंता यांचे निलंबन केले असल्याने नादुरुस्त बस प्रवासी वाहतुकीसाठी पाठवणाऱ्यांवर आता एसटी महामंडळाकडून चांगलीच कारवाई केली जाणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील आहेरी आगाराची बस क्रमांक एम एच 40 वाय 5494 ही बस गडचिरोली मुलचेरा महामार्गावर धावत असताना वाहकाच्या बाजूचा बसचा छत उकडून हवेमध्ये उडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर याबाबतच्या बातम्या अनेक माध्यमांमध्ये दाखवण्यात आल्या होत्या. या घटनेमुळे एसटी महामंडळाच्या गाड्यांची किती बकाल अवस्था आहे याचे वास्तव समोर आले होते. या घटनेची गंभीर दखल घेऊन एसटी महामंडळ प्रशासनाने या गाडीच्या चालकाकडून खुलासा मागवला आहे.

त्यामध्ये गाडी गडचिरोली विभागीय कार्यशाळेमध्ये दुरुस्तीचे काम करण्यासाठी लावण्यात आली होती मात्र गाडीची दुरुस्ती वेळेत न झाल्यामुळे गाडी तशीच प्रवासी वाहतुकीसाठी सोडण्यात आली होती त्यामुळे बसच्यात हवेत उडत असल्याची घटना घडली असल्याचा खुलासा चालकांनी केला आहे. चालकाने खुलासा केल्यानंतर एसटी महामंडळ प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन गडचिरोली भागाचे यंत्र अभियंता एस आर बिराजदार यांना निलंबित केले आहे. या घटनेमुळे एसटी महामंडळाचे प्रतिमा सर्वसामान्य नागरिकांमध्ये मलिन झाली असल्यामुळे या घटनेची चौकशी होईपर्यंत बिराजदार यांचे निलंबन करण्यात आले असल्याचे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.

यासोबतच यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी एसटी महामंडळाने कंबर कसली असून वाहनाची दुरुस्ती अथवा वाहनबांधणीतील त्रुटी न काढता वाहन प्रवासी वाहतुकीसाठी देण्यात येऊ नये अशा सूचना राज्यातील सर्व आजार प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊनच यापुढे बस प्रवासी वाहतुकीसाठी सोडाव्यात असे देखील एसटी महामंडळ प्रशासनाकडून बजावण्यात आले आहे. एसटी महामंडळ प्रशासनाने थेट यंत्र अभियंत्यावर कारवाई केली असल्याने यापुढे नादुरुस्त बस प्रवासी वाहतुकीसाठी सोडल्यास अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles