शुक्रवारीय काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

*पाझर*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नाती गोती काय कामाची
फुटेना पाझर दगडाला
म्हातारपणीचा शाप भोगते
धार अश्रूंची डोळ्याला

*सविता धमगाये नागपूर*
जि. नागपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️🔹✍️♾️♾️♾️♾️
*पाझर*

जीवनभर खाल्ल्या खस्ता
आतातरी यातना संपतील का?
आयुष्याच्या शेवटी तरी
पाझर वेदनांना फुटेल का?

*सौ अर्चना जगदीश मेहेर*
ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️🔹✍️♾️♾️♾️♾️
*पाझर*

हातावरचे पोट आमचे
पदरमोडीतून उभे केले घर…
ते वाहून नेतांना हे’, देवा’
नाही फुटला रे तुला पाझर..!!

*सौ वनिता गभने आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️🔹✍️♾️♾️♾️♾️
*पाझर*

वृद्धपणात आईबापाला
द्या आधार काठी बनून
पाझर फुटू द्या दयेचा
द्या माया आपले म्हणून

*श्रीमती सुलोचना लडवे*
अमरावती
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️🔹✍️♾️♾️♾️♾️
*पाझर*

सारे वाहूनिया गेले
वाहे अश्रूंचा सागर
झाला हतबल बाप
फुटे दगडा पाझर

*विनायक कृष्णराव पाटील बेळगाव*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्य*
♾️♾️♾️♾️✍️🔹✍️♾️♾️♾️♾️
*पाझर*

**फिटेल का अंधाराचे जाळे,*
*होईल का मोकळे आकाश…?*
*फुटून मुलाला मायेचा पाझर,*
*येईल बापाच्या जीवनी प्रकाश..?*

*कवी श्री.मंगेश पैंजने सर,*
*ता.मानवत,जिल्हा-परभणी,*
*© सदस्य,मराठीचे शिलेदार समुह.*
♾️♾️♾️♾️✍️🔹✍️♾️♾️♾️♾️
*पाझर*

नको पैसा नकोच संपत्ती
भरा ममतेची घागर
प्रेम असू दया इतपत की,
फुटेल पाषाणालाही पाझर

*✍️ पु. ना. कोटरंगे*
ता. सावली, जि. चंद्रपूर
*©सदस्य :- मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️✍️🔹✍️♾️♾️♾️♾️
*पाझर*

राबराबून खंगला हा देह
उपरी झाली स्वप्नांची नजर
आयुष्याच्या उतरणीतही
थांबत नाही आसवांचा पाझर

*सौ.आशा कोवे- गेडाम*
*वणी जि. यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles