आर्वी येथील समन्वय बैठकीत कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे विविध प्रश्नाची मांडणी

आर्वी येथील समन्वय बैठकीत कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे विविध प्रश्नाची मांडणी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वर्धा/ आर्वी: येथील पं.स.आर्वी येथे सर्व शिक्षक संघटनांची समन्वय सभा सुरेश पारडे, गटशिक्षणाधिकारी आर्वी यांच्या आदेशानुसार पार पडली. यात कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे विविध प्रलंबित प्रश्न मांडण्यात आले.

सभेत पदवीधर शिक्षकांना दुसरी चटोपाध्याय वेतनश्रेणी मंजूर करणे, जी.पी.एफ.प्रकरणे लवकर निकाली काढणे, 24 Q ची कार्यवाही प्रत्येक तिमाहीला करणे, वैद्यकीय बिलं, गणवेश अनुदान,सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना गटवीमा मिळणे, पगाराचे पीडीएफ शिक्षकांना पुरविणे, दुय्यम सेवापुस्तकांवर मा.गशिअ.साहेब यांच्या सह्या करणे, प्रत्येक बील हे जे आधी मंजूर झाले ते आधी काढणे अशा अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

गशिअ साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन शिक्षक संघटनांना दिले. वरील समन्वय सभेत कास्ट्राईब शिक्षक संघटना,प्राथमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक समिती चे पदाधिकारी हजर होते.तसेच कार्यालयाचे मा.पंकज तायडे साहेब (विअशि), आत्राम साहेब (अधिक्षक), राऊत बाबू, काकडे बाई हजर होत्या. तर कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राजेश सोमकुवर, प्रकाश बनसोड, पवन झटाले, गजानन मनवरे,आ.दा.पाटील, प्रफुल कांबळे हे हजर होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles