शासकिय वैद्यकिय महाविद्यालय हिंगणघाटलाच; यासाठी मुंबईत धरणे आंदोलन

शासकिय वैद्यकिय महाविद्यालय हिंगणघाटला यासाठी मुंबईत धरणे आंदोलन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_धरणे आंदोलनात हिंगणघाट शहरातील शेकडो आंदोलकांचा सहभाग_

-माजी मंत्री जयंत पाटील यांनी दिली धरणे आंदोलनस्थळी भेट_

वर्धा: महाराष्ट्रात मंजूर झालेल्या शासकीय मेडिकल कॉलेजच्या यादी वर्धा जिल्ह्याचे नाव येताच हे मेडिकल कॉलेज हिंगणघाट शहरात होण्यासाठी म्हणून हिंगणघाट शहरात मागील तीन महिन्यांपासून धरणे आंदोलन सुरू आहे.
शासकीय वैद्यकीय मेडिकल कॉलेज संघर्ष समितीच्या सदस्यांनी आता हेच धरणे आंदोलन मुंबई येथील आझाद मैदानावर देणे सुरू केले आहे. मुंबई येथील आझाद मैदानावर या धरणे आंदोलनात माजी मंत्री जयंत पाटील यांनी आज भेट दिली.

हिंगणघाट शहरांमध्ये शासकीय वैद्यकीय मेडिकल कॉलेज व्हावे यासाठी म्हणून मागील तीन महिन्यात मोठी आंदोलने केली जात आहे. हिंगणघाट शहर बंद ठेवत मोठी रॅली देखील हिंगणघाट शहरात मेडीकल कॉलेजसाठी म्हणून काढण्यात आली आहे.

हिंगणघाट शहरातील हजारोच्या संख्येने नागरिकांचा सहभाग या रॅलीमधे होता. शहरातील महिला देखील वेगवेगळ्या पद्धतीने शहरातील आंबेडकर चौक येथे धरणे आंदोलन देत आहेत. यामुळे आता हिंगणघाट शहराचेच नव्हे तर जिल्ह्याचे लक्ष मेडिकल कॉलेज कुठे निर्माण होणार यावर लागली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles