नाजेर काजी यांच्या कोलांटउडी नंतर, बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार रेखा खेडेकर यांची नियुक्ती

नाजेर काजी यांच्या कोलांटउडी नंतर, बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार रेखा खेडेकर यांची नियुक्ती



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_बुलढाण्यातील राजकीय समीकरणे बदलणार_

बुलढाणा: जिल्ह्याच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष पदाची माळ माजी आमदार रेखा खेडेकर यांच्या गळ्यात टाकण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील माजी मंत्री आमदार राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ बुलढाणा जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हे सुद्धा अजित पवार गटात जाऊन सामील झालेत.

जे जिल्हाध्यक्ष नाजेर काजी आपण काहीही झालं तरी शरद पवारांसोबतच राहू अशी भाषा करत होते त्यांनी ऐन वेळेवर कोलांटउडी घेत आमदार राजेंद्र शिंगणे च्या पाठोपाठ अजित पवार गटात उडी घेतली आहे.

त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने देखील वेगळी खेळी करत बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदाची माळ माजी आमदार रेखा खेडेकर यांच्या गळ्यात टाकल्याने अजित पवार गटाची गोची झाली आहे. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पत्नी माजी आमदार रेखा खेडेकर यांच्याकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाची जबाबदारी आल्याने शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीची बाजू बुलढाणा जिल्ह्यात भक्कम झाल्याच पाहायला मिळतय. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles