कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या सोनपेठ तालुकाध्यक्षपदी लक्ष्मीकांत गायकवाड तर सचिवपदी यशपाल सावंत

कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या सोनपेठ तालुकाध्यक्षपदी लक्ष्मीकांत गायकवाड तर सचिवपदी यशपाल सावंत



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

परभणी: मराठवाडा विभागाचा बालेकिल्ला असलेल्या परभणी जिल्ह्यातील कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या सोनपेठ तालुक्याच्या कार्यकारणीची पुनर्रचना करून दि २५ जुलै रोजी आनलाईन बैठकीत नव्याने गठीत करण्यात आली. परभणी जिल्हा कार्यकरणी सदस्य, राज्य सरचिटणीस व कृष्णा इंगळे यांच्या परवानगीने कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या सोनपेठ तालुकाध्यक्षपदी लक्ष्मीकांत गायकवाड तर सचिवपदी यशपाल सावंत यांची निवड करण्यात आली आहे.

कास्ट्राईब शिक्षक संघटना सोनपेठ तालुका कार्यकारिणी पुर्नगठन ऑनलाईन बैठकीत सतीश कांबळे, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम अध्यक्ष, दिपक पंडित, परभणी जिल्हा अध्यक्ष, प्रमुख पाहुणे मायादेवी गायकवाड, राज्य महिला प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते. लक्ष्मीकांत गायकवाड व यशपाल सावंत यांच्या संघटन कौशल्यावर पुनश्च विश्वास दाखवून कृष्णा इंगळे व सतीश कांबळे यांनी त्यांना कार्य करण्याची संधी दिली आहे.

वरिल सर्व मान्यवर व्यक्तिमत्त्वासोबतच राज्य व जिल्ह्य़ातील बहुसंख्य मातब्बर नेते तसेच कास्ट्राईबचे असंख्य शिलेदार या ऑनलाईन बैठकीस उपस्थित होते. सर्व सन्माननीय मान्यवरांनी मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले. परभणी जिल्हा अध्यक्ष दिपक पंडित यांनी खालील प्रमाणे कार्यकारिणीचे पुर्नगठन करून जाहीर केले.

*सोनपेठ कार्यकारणी सदस्य*

अध्यक्ष: श्री.लक्ष्मीकांत गायकवाड
सचिव: श्री.यशपाल सावंत
कार्याध्यक्ष: श्री.विनोद दाढेल उपाध्यक्ष: श्री.अतुल आगळे, श्री.केदार लोखंडे, श्री.महादेव राठोड, श्री.सोमनाथ पोरे
कोषाध्यक्ष: अमोल मनोहर
महिला प्रतिनिधी: भराडे मॅडम, गायकवाड मॅडम, सोनहिवरे मॅडम, डोंगरे मॅडम
कार्यकारिणी सदस्य: दशरथ कांबळे, आशिष धसकटे, गोविंद उदगिरे, शंकर राठोड, नवनाथ चव्हाण, रामप्रसाद बंडे, भगवान राठोड
प्रमुख मार्गदर्शक: किशोर धिवार, विश्वनाथ गायकवाड, सायस नाईकवाडे

सर्व सन्माननीय मान्यवरांकडून नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात आले. पुढील दैदीप्यमान कार्यासाठी सर्वांना शुभेच्छापत्र व नियुक्तीपत्र देण्यात आले. अशा प्रकारे वेळेचा व खर्चाचा अपव्यय टाळून ऑनलाईन बैठक आयोजित करून सोनपेठ तालुक्यातील कार्यकारिणीचे नव्याने गठन करण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles